समांथाकडून ‘रक्त ब्रह्मांड’चे चित्रिकरण सुरू
राज-डीके या जोडीची वेबसीरिज
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने स्वत:ची आगामी वेबसीरिज ‘रक्त ब्रह्मांड’चे चित्रिकरण सुरू केले आहे. या अॅक्शन-फॅन्टसी सीरिजचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे करत आहेत. ही सीरिज राज निदिमोरु आणि कृष्णा डीके या जोडीकडून निर्माण केली जात आहे. ही जोडी ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनवरही काम करत आहेत. रक्त ब्रह्मांड या सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
स्वप्नं पाहणं कधीच बंद करू नका, काही काळानंतर रक्त ब्रह्मांडच्या सेटवर परतून आनंद झाल्याचे समांथाने म्हटले आहे. रक्त ब्रह्मांड ही एक काल्पनिक साम्राज्यावर आधारित राज-डीके यांची पहिली अॅक्शन फँटसी सीरिज आहे. द फॅमिली मॅनचे चित्रिकरण करत असताना राज-डीके हे रक्तब्रह्मांडच्या प्रगतीवर नजर ठेवून आहेत.
या सीरिजचे बहुतांश चित्रिकरण फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील सेटवर आणि शहराच्या अन्य हिस्स्यांमध्ये पार पडणार आहे. सीरिजला रक्त, विश्वासघात आणि साम्राज्यांची एक महाकाव्य कहाणीच्या स्वरुपात वर्णिले गेले आहे. यात अली फजल आणि वामिका गब्बी हे दिग्गज कलाकारही दिसून येणार आहेत.