समांथाकडून चित्रपटाची निर्मिती
शुभम’ कुटुंबासह पाहता येणारा चित्रपट
समांथा रुथ प्रभूच्या प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट ‘शुभम’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रालाला पिक्चर्सकडून निर्मित या हॉरर कॉमेडीमध्ये ती एक मजेशीर कॅमियो करताना दिसून येणार आहे.
ट्रेलरच्या प्रारंभी काही पुरुष स्वत:च्या पत्नींनी घरात सदैव कॉफी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसून येतात. परंतु यातील एक पुरुष त्यांच्या ‘अल्फा मेल’युक्त मानसिकतेशी सहमत होताना दिसून येत आहे. महिला पुरुषाच्या हातात कॉफीचा कप देताना दिसून येते, परंतु याचदरम्यान घरातील महिलांना दरदिनी रात्री 9 वाजता सुरू होणारा एक टीव्ही शो पाहण्याचे व्यसन जडते, हा शो त्यांच्यावर एका जादूप्रमाणे काम करू लागतो असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
ट्रेलरच्या अखेरीस समांथाची एक छोटी झलक दाखविण्यात आली आहे. यात ती एका देवतेची व्यक्तिरेखा साकारत आहे. यात ती पुरूषांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसून येते. शुभम हा चित्रपट प्रेक्षकांना कुटुंबासह पाहता येणार असल्याची माहिती समांथाने दिली आहे.