महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एफटीएक्सचे सह संस्थापक सॅम बँकमन फ्राइड यांना 25 वर्षांची शिक्षा

06:14 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅनहॅटन :

Advertisement

दिवाळखोर क्रिप्टो एक्सचेंज फर्म एफटीएक्सचे सह-संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॅमवर क्रिप्टो फसवणूक, ग्राहकांचे पैसे चोरणे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँकमन-फ्राइडचे तीन मित्रही दोषी आहेत.

Advertisement

या प्रकरणात, सॅमला डिसेंबर-2022 मध्ये बहामासमधून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. नोव्हेंबर 2023 मध्ये गुंतवणूकदार आणि ग्राहकांची 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 832 अब्ज रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकमन दोषी आढळला होता. हे प्रकरण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानले जात होते. बँकमन-फ्राइडला दोषी ठरवल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article