मॅरेथॉनमधून हुतात्मा जवानांना अभिवादन
कोल्हापूर :
पुण्यातील सदर्न कमांड, सेना मुख्यालय दक्षिण कमांड आयोजित आर्मी विजय दिवस 50 किलो मीटर अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये धावपटूंनी धावून देशाच्या संरक्षार्थ प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवान, अधिकाऱ्यांना गुऊवारी विन्रम अभिवादन केले. निमित्त होते 77 व्या आमा-डे-परेड 2025 चे (आर्मी विजय दिवस). 109 टी. ए. मराठा बटालियन लाईट इन्फ्रंट्रीने संयोजन केलेल्या मॅरेथॉनमध्ये आठशेहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये कोल्हापूर शहरातील 500, शहरानजिकच्या गावांमधील 100 आणि शिवाजी विद्यापीठातील 200 अशा आठशे धावपटूंचा सहभाग होता. या धावपटूंसोबत पुणे, मुंबई, अहिल्यानगर येथील धावपटूंनीही मॅरेथॉनमध्ये दौड कऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.
यंदाही 15 जानेवारी 2025 रोजी आर्मी विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित आर्मी विजय दिवस मॅरेथॉनची सुरुवात 6 डिसेंबर रोजी कुलाबा (मुंबई) येथून झाली आहे.
कोल्हापूरात 12 डिसेंबरला टेंबलाई टेकडीजवळील मिल्ट्री कॅम्प येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडे 6 वाजता मॅरेथॉनला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते सुरुवात केली.
मॅरेथॉनध्ये धावलेल्या सर्व धावपटूंना 109 टी. ए. मराठा बटालियन लाईट इन्फ्रंट्रीकडून टी-शर्ट देण्यात आले. मॅरेथॉनला सुऊवात होण्यापूर्वी भाई माधवराव बागल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व झांझपथकातून कवायती सादर केल्या. तसेच टेरीयर प्रायमरी स्कूल, आबू स्कूल व शांतीनिकेतन स्कूलच्या 1500 विद्यार्थ्यांनी हातातील देशाचा तिरंगा लहरत मिल्ट्री कॅम्प येथून मॅरेथॉनला सुऊवात केलेल्या धावपटूंना चिअर-अप केले. भारत माता की जय, जय जवान-जय किसान, आर्मी विजय दिवस चिरायू होवो, अशा घोषणा दिल्या. मॅरेथॉन मार्गाच्या दुतर्फा उभे राहिलेल्या लोकांनी स्वयंस्फुर्तीने तिरंगा फडकावत धावपटूंना प्रोत्साहित केले. यामुळे मॅरेथॉनमध्ये जणू क्रीडा संस्कृती आणि सशस्त्र दलांबद्दलचा आदरच क्षणाक्षणाला प्रकट होत होता.
दरम्यान, शहरातील विविध मार्गावऊन 50 किलो मीरटची दौड करताना धावपटूही भारत माता की जय, जय जवान-जय किसानचा नारा देत होते. मॅरेथॉनच्या मार्गात ठिकठिकाणी 8 बुथ उभारले होते. या बुथवर धावपटूंना एनर्जी देणारे लिंबू पाणी, केळी, पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रींक, लिंबू ठेवले होते. या कामात व्हाईट आर्मीनेही मदतीचा हात दिला. धावपटूंना धावतेवेळी पायाला दुखापत झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी मार्गात तीन ऊग्णवाहिका तैनात ठेवल्या होत्या. दरम्यान, शुक्रवार 13 रोजी माजी सैनिकासाठी आरोग्य तपासणी शिबीर व पेंशनबाबतच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा विशेष कार्यक्रम होणार आहे. मिल्ट्री कॅम्पमध्ये हा कार्यक्रम होईल. सकाळी 9 ते दुपारी 2 अशी कार्यक्रमाची वेळ आहे. तसेच 14 डिसेंबरला मिल्ट्री कॅम्पमधील ट्रेनिंग ग्राऊंडवर 50 किलो मीटर आर्मी विजय दिवस रन फ्लॅग ऑफ कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल.