For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेरू देशामधील मिठाचे तलाव

06:47 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
पेरू देशामधील मिठाचे तलाव
Advertisement

पेरूच्या उंच पर्वतांमध्ये एक छोटेसे गाव असून तेथे सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे छोटे छोटे तलाव निर्माण झाले आहेत. हे पर्वतावर निर्मित आहेत, हे तलाव मिठाच्या खाणींचा हिस्सा आहेत, येथील लोक शतकांपासून मीठ मिळवत आले आहेत. मारास आणि पिचिंगाटो गावातील परिवार हे ‘अयनी’ नावाच्या प्राचीन परंपरेशी जोडलेले आहेत.

Advertisement

‘अयनी’चा अर्थ परस्परांना मदत असा होतो. उन्हाळ्याच्या अखेरीस जेव्हा उरियल स्वत:च्या कामाचा प्लॅन तयार करतात, तेव्हा सर्वप्रथम आज कुठल्या मित्राच्या मिठाच्या तलावावर काम करणार याचा विचार करतात. हे लोक महिन्यात एकदा परस्परांच्या मदतीने मीठ गोळा करत असतात.

 

आज आम्ही आमच्या तलावांवर काम केले, उद्या आम्ही माझ्या मित्रांच्या तलावांवर जाऊ असे उरियल यांचे सांगणे आहे. मारास आणि पिचिंगोटोचे स्थानिक लोक मिळून एक कोऑपरेटिव्ह चालवतात, ज्याचे नाव मरासल आहे. हे कोऑपरेटिव्ह मीठाला बाजारात विकण्याचे आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे काम करते. हे तलाव 500 वर्षे जुने आहेत, परिवारांदरम्यान हे तलाव पिढ्यान पिढ्या हस्तांतरित होतात. अनेक लाख वर्षांपूर्वी एंडीज पर्वतांच्या या भागात एक सागरी हिस्सा वेगळा झाला होता, जेव्हा समुद्र मागे हटला, तेव्हा मिठाचा भांडार मागेच राहिला.

Advertisement

आता हे मीठ भूजलाद्वारे पर्वतांच्या एका झऱ्यामधून बाहेर येते, रोजेन चेंबर्स नावाच्या भूवैज्ञानिक आणि ‘द मॉन्यूमेंटल एंडीज’च्या लेखिका यांनी ही प्रक्रिया नैसर्गिक असल्dयाचे सांगितले आहे. तर पेरूच्या संस्कृती मंत्रालयानुसार इंका साम्राज्याच्या काळापासून येथे मीठ काढले जात आहे. आता हे तलाव पर्वतावर जिनेवजा शेतांप्रमाणे वाटतात. यांचा रंग पांढरा आणि काळामिश्रित असतो. 1968 मध्ये पेरूमध्ये सैन्य सत्तापालटानंतर 1969 साली सरकारने पूर्ण देशात मीठ काढणे आणि विकण्याचे नियंत्रण स्वत:कडे घेतले होते. एक सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली, मारासच्या परिवारांना तलावांच्या देखभालीसाठी पैसे दिले जात होते. हा भाग परत केला जावा, अशी मागणी लोकांनी केली होती, अखेर या परिवारांना नियंत्रण परत मिळाले. आता ते स्वत: मालक असून मारासचे लोक एका खारट प्रवाहातून छोटे छोटे चॅनेल खोदतात, हे चॅनेल तलावांना भरतात, हळूहळु पाणी उडून जाते,  मीठ शिल्लक राहते. या मिठाला स्कूपद्वारे काढून धुतले जाते, कोरडे केले जाते. शेतकरी 50 किलोग्रॅमच्या पोतीत मीठ भरतो, मग पोती वजन स्टेशनवर नेण्यात येते. तेथून कोऑपरेटिव्ह मरासलमध्ये प्रक्रियेसाठी पाठविले जाते. जर कुणी निर्यात करू इच्छित असेल तर तो करू शकतो. दर महिन्याला प्रत्येक तलावातून 150-250 किलोग्रॅम मीठ निघतो, पावसामुळे तलाव कोरडा होणे कठिण ठरते. जर एखादा परिवार तलाव विकू इच्छित असेल तर मारास, पिचिंगोटोच्या रहिवाशालाच विकता येतो.

Advertisement
Tags :

.