स्वीमिंग पूलमध्येच सलून
केस कापण्यासोबत पकडतात मासे
प्रत्येक शहरात एखादे सलून प्रचंड प्रसिद्ध असते. अशाच एका सलूनमध्ये केवळ केस कापले जात नसून मासेही पकडले जात आहेत. तुम्ही अनेक प्रकारचे सलून आणि स्पा पाहिले असतील, परंतु अशाप्रकारचा सलून पाहिला नसेल. तेथे वर हेअरकट सुरु असते, तर खाली मासे फिरत असतात. हे वॉटर सलून इतके आकर्षक आहे की येथे ग्राहकांची मोठी रांगच लागलेली असते.
या सलूनचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात खाली पाणी भरलेले असून खुर्चीवर बसून लोक केस कापून घेत असल्याचे दिसून येते. या सलूनमध्ये अनेक जण काम करत असताना गुडघ्यापर्यंत तेथे पाणी भरलेले आहे. ग्राहकाला या पाण्यामुळे कुठलाच त्रास होत नसल्याचे व्हिडिओत दिसून येते. तेथे पाण्यात जाळ्याद्वारे कापलेले केस साफ केले जातात. हा वॉटर सलून इंडोनेशियात आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.6 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर 2 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. लोकांनी यावर कॉमेंट करत ही इंटरनेटवर पाहिलेली सर्वात खराब गोष्ट असल्याचे म्हटले आहे. अनेक लोकांनी वॉटर सलूनची ही कल्पना रुचलेली नाही.