Solapur : सोलापुरात साळींदरची दहशत !
सोलापुरात साळींदरांचा उपद्रव वाढला; वनविभागाकडे हस्तक्षेपाची मागणी
सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या आठ दिवसांपासून साळींदरांनी दहशत निर्माण केली आहे. कपाळे वस्ती परिसरात साळींदरने केलेल्या हल्ल्यात एक श्वान जबर जखमी झाले असून त्याच्या तोंडात व चेहऱ्यावर साळींदरचे काटे घुसले आहेत. शिवाय इतर जनावरांनाही याचा धोका होतो आहे.
शहराजवळून वाहणाऱ्या आदिला नदीला गेल्या आठ दिवसांपूर्वी पूर आला होता. या पुरामुळे वसंत विहार, गणेश नगर, मडकी वस्ती, प्रभाग क्रमांक ३ मधील कपाळे वस्ती परिसरात प्रचंड पाणी वाढले होते. त्यापाण्यातून या परिसरात दोन ते तीन साळींदर आले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी एका साळींदरने गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील एका पाळीवर श्वानावर हल्ला केला. यामध्ये त्या श्वानाच्या संपूर्ण चेहऱ्यावर साळींदरचे काटे घुसले आहेत. शिवाय एका वासरावरही साळींदरने हल्ला केल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या साळींदरचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.