महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने घसरण

07:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाजारात गुरुवारचे सत्रही प्रभावीत : सेन्सेक्स 110 अंकांनी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय बाजारात घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि वाढत जाणार महागाईचा दर यामुळे गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 110.64 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.14 टक्क्यांसह 77,580.31 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 26.35 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 23,532.70 वर बंद झाला.

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 10 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये  रिलायंस इंडस्ट्रीज, कोटक बँक, टेक महिंद्रा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक यांचे निर्देंशांक वधारले आहेत. तसेच एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि टायटन यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 20 समभाग प्रभावीत राहिले आहेत. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि पॉवरग्रिड कॉर्प हे मोठ या प्रमाणात घसरणीत राहिले आहेत. याशिवाय, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, टाटा स्टील, सन फार्मा, एसबीआय, अल्ट्राटेक सीमेंट, मारुती, एल अँड टी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टीसीएस आणि अॅक्सिस बँकेचे समभाग कमकुवत होत बंद झाले आहेत.

पैसे काढणे सुरुच

शेअर बाजार आंकड़ेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) नी बुधवारी 2,502.58 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली आहे. तसेच  स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) नी 6,145.24 कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे. पेट्रोल मूल्यावर आधारित मुद्रास्फीति सप्टेंबर 2024 मध्ये 1.84 टक्के होती. हा आकडा ऑक्टोबर 2023 मध्ये 0.26 टक्क्यांनी कमी राहिला आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article