For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

10:49 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री
Advertisement

बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये असलेल्या बसस्थानकांच्या शेजारी दुकानांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लीजवर ती दुकाने देण्यात आली असून त्या ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे बंदी आहे. मात्र काही दुकानांमधून गुटखा, तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री केले जात आहेत, अशा तक्रारी करण्यात येत आहेत. दरम्यान बसस्थानकाशेजारी 4×4 अशी जागा दिली आहे. मात्र काहीजणांनी अतिक्रमण करून रुंदी व लांबी वाढविली आहे. परिणामी ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहतुकीलाही त्रास होत आहे. या ठिकाणी आरोग्याच्या हिताच्या वस्तूच विक्री करण्यासाठी मुभा आहे. मात्र आरोग्याला हानी पोहोचविणाऱ्या वस्तू विक्री केल्या जात आहेत. तेव्हा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी, याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान अनेकजण गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ खावून त्या बसथांब्याजवळच थुंकत आहेत. याचबरोबर सिगारेट पिणाऱ्यांमुळेही महिला व बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तेव्हा विक्री करण्यात येत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.