ओप्पो एनसीओ बड्स 3 प्रो चा विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओप्पो एनसीओ बड्स 3 प्रो टीडब्लूएस हेडसेट भरतात आले आहेत. यावेळी ओप्पो के 13 टर्बो स्मार्टफोची मालिका भारतात सादर करण्यात आली. यांची विक्री बुधवारपासून सुरु झाली आहे. ओप्पो एनसीओ बड्स 3 प्रोची किंमत ही 1,799 रुपये आहे. हा काळ्या व पांढऱ्या रंगात उपलब्ध होणार आहे. इयरबड्समध्ये 12.4 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स, ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आहे आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी55 रेट केलेले आहे.
इअरफोनमध्ये 58 एमएएच बॅटरी
ओप्पो एनसीओ बड्स 3 प्रो हेडसेटमध्ये प्रत्येक इअरफोनमध्ये 58 एमएएच बॅटरी आणि चार्जिंग केसमध्ये 560 एमएएच बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की हे इअरफोन एका चार्जवर 12 तासांपर्यंत टिकू शकतात. केस वापरून 54 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळवता येतो. 10 मिनिटे जलद चार्जिंग केल्याने इयरफोन्सना 4 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळतो.