कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोहरम मिरवणुकीनिमित्त शहर-तालुक्यात मद्यविक्रीवर बंदी

12:28 PM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस आयुक्तांनी जारी केला आदेश

Advertisement

बेळगाव : रविवार दि. 6 जुलै रोजी होणाऱ्या मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात मद्यविक्री बंदीचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश दिला आहे. रविवारी मोहरमची मिरवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 5 जुलै रोजी सायंकाळी 6 पासून सोमवारी 7 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत बार, रेस्टॉरंट, क्लब, वाईन शॉप व हॉटेलमध्ये मद्यविक्री व त्याची वाहतूक बंदीचा आदेश देण्यात आला आहे. दारू दुकाने, केएसबीसीएल डेपो, हॉटेल व बारना सील ठोकण्याचा आदेश दिला असून अबकारी निरीक्षक व प्रांताधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करण्याची सूचना केली आहे. अबकारी उपायुक्त, पोलीस उपायुक्त व दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना देतानाच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article