पगार जास्त दाखवून कामगारांच्या पगारावर डल्ला! कंपनीवर जीएसटीची रेड
जीएसीटी अधिकाऱ्यांची रेड झाकली मूठ सव्वा लाखाची
प्रतिनिधी सातारा
सातारा शहरातील एमआयडीसी येथे कोडोली आयडीबीआय बँकेच्या समोर एक कंपनी आहे. त्या कंपनीवर जीएसटी कार्यालयाकडून रेड टाकण्यात आली आहे. या कंपनीने कामगारांना व्हाउचरवर वेगळा पगार आणि हातात वेगळा पगार दिल्याच्या तक्रारी झाल्याने ही रेड पडल्याची चर्चा सातारा शहरात सुरू होती. दरम्यान, रेड सुरू असल्याने या कंपनी भोवती पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे रेड नेमकी जीएसटीच्या कोणत्या पथकाने केली हे समजू शकले नाही.
सातारा एमआयडीसी येथील एका मोठ्या कंपनीत रेड पडल्याची सकाळी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. सातारा शहरात जीएसटीची दोन कार्यालय आहेत एक पोवई नाका येथे आणि दुसरं एमआयडीसीमध्ये. दोन्ही कार्यालयात सुद्धा या रेडबाबत काहीच ज्ञात नव्हते. रेड टाकण्यासाठी आलेले अधिकारी हे तरुण असून ते हिंदी कम इंग्रजी मध्ये त्यांचा संवाद सुरू होता. तरुण भारतच्या प्रतिनिधीना याची माहिती मिळताच त्या कंपनीचा शोध घेतला असता कंपनीला बाहेर असा नावाचा बोर्ड दिसत नव्हता. एका इमारतीत ही कंपनी असून बाहेर दोन तीन आलीशान गाड्या दिसत होत्या. कंपनीवर रेड सुरू असल्याने बंदोबस्ताला असलेले पोलीस तिथे कोणाला थांबू देत नव्हते. त्यामुळे नागरिकांना नेमके या इमारतीत काय सुरू आहे याचे कुतूहल सुरू होते. सकाळी रेड टाकण्यासाठी आलेल्या अज्ञात अधिकाऱ्यांनी जे कंपनीत आत मध्ये कामगार होते त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून काढून घेतले होते. त्यांना बाहेर सोडले जात नव्हते तर जे नव्याने बाहेरून कामगार येत होते त्यांना आतमध्ये घेतले जात नव्हते. त्यामुळे कंपनीत आतमध्ये नेमके काय सुरू आहे हे मात्र समजू शकले नाही."
पोलिसांनी पत्रकारांच्या आयकार्डवर संशय
स्थानिक पत्रकार रेड बाबत माहिती घेण्यासाठी कंपनी परिसरात गेले होते त्यावेळी कंपनीचे फोटो काढल्याची बाबत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास रेड करण्यासाठी आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केली. त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईलबाबत पत्रकारांना विचारणा केली तसेच आयडी कार्ड बाबत ही विचारणा केली आणि आयडी कार्ड वर संशय व्यक्त केला.
रेड टाकायची तर खुले पणाने टाकावी
ज्या कंपनीबाबत वा कोणत्याही फर्म बाबत कोणत्याही विभागाला रेड करायची असेल तर खुल्यापणाने मीडियाला माहिती देऊन टाकावी, म्हणजे रेड करणारे आणि संबंधित कंपनी काही तडजोड करून रेड प्रकरण दडपले जाणार नाही याचीही चर्चा सातारा शहरात सुरू होती.