महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंगणवाडी सेविकांचे वेतन थकले

11:45 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेविकांसमोर अडचणी : भाडोत्री अंगणवाड्यांचेही अनुदान ठप्प, अंगणवाडी सेविकांसमोर संकट

Advertisement

बेळगाव : दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीसांचे वेतन थकले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. आधीच महागाईने कहर केला आहे. त्यातच वेतन सुरळीत मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांसमोर संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. यामध्ये 7600 अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. मात्र या सर्व सेविकांचे वेतन ठप्प झाले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातही अडचणी येऊ लागल्या आहेत. अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांचे संगोपन, गर्भवती महिलांना सकस आहाराचे वाटप, कुपोषण निवारण, मतदार नोंदणी यासह इतर कामांचा ताण आहे.

Advertisement

आज होणार बैठक

अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवार दि. 28 रोजी बापट गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्समध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या वेतनाबरोबरच इतर समस्यांवर चर्चा होणार आहे. शिवाय पुढील रुपरेषा ठरविली जाणार आहे.

अंगणवाड्यांचे भाडेही थकले

जिल्ह्यात 1348 भाडोत्री अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रांचे भाडे थकले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी वाढली आहे. शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने भाडे देणे अशक्य झाले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे वेतन थकले 

जुलै महिन्यातील वेतन अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना देण्यात आले आहे. केवळ ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबले आहे. तेही येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम थांबले होते.

- आण्णाप्पा हेगडे (महिला व बाल कल्याण खाते अधिकारी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article