सकल मराठातर्फे मल्ल-प्रशिक्षकांचा गौरव
बेळगाव : सकल मराठा समाजाच्यावतीने म्हैसूर दसरा क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या मराठा समाजातील खेळाडूंचा खास गौरव करुन शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, अॅड. अमर यळ्ळूरकर, नागेश देसाई, प्रशांत भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, रेश्मा पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, प्रवीण पाटील, माधुरी जाधव, सुनील चोळेकर, अनिल पाटील, सुनील जाधव, प्रशांत पाटील व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस दलात व क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या पोलीस अधिकारी श्रुती पाटील, एनआयएस प्रशिक्षक स्मिता पाटील, दसरा किशोर किताब विजेती स्वाती पाटील, कंठीरवा केसरी कामेश पाटील-कंग्राळी, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक प्रशांत पाटील,
प्रेम जाधव, महेश बिर्जे-तिर्थकुंडये, विनायक पाटील-येळ्ळूर, समर्थ डुकरे-किणये, प्रांजल तुळजाई-अवचारहट्टी, भक्ती पाटील-कंग्राळी, सानिका हिरोजी-कलखांब, श्रावणी तरळे-आंबेवाडी, अनुश्री चौगुले-अलतगा या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी वरील होतकरु कुस्तीपटूंना शुभेच्छा देवून पुढील काळात होणाऱ्या स्पर्धांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन केले. सकल मराठा क्रीडा संघटनेची स्थापना करण्यात येणार असून या संघटनेत जमा होणाऱ्या निधीतून तालुका ते राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना आर्थिक मदत केली जाणार आहे. यामुळे मराठा समाजातील क्रीडापटूंना न डगमगता जोरदार सराव करावा. त्यांना संघटनेचे पाठबळ मिळणार आहे, असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.