For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईश्वरी कोडचवाडकर कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्कार

09:57 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
साईश्वरी कोडचवाडकर कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्कार
Advertisement

बेळगावच्या ज्युडो खेळाडूचा सन्मान

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात बेळगावची ज्युडो खेळाडू साईश्वरी कोडचवाडकर हिला केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेंगळूर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कित्तूर राणी चन्नम्मा हा पुरस्कार साईश्वरी कोडचवाडकर हिला प्रमाणपत्र, चषक, कर्नाटकी पगडी, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार प्रतिवर्षी महिला दिनानिमित्त महिला व बालविकास खाते, कला, क्रीडा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना देण्यात येतो. यावर्षीचा क्रीडा पुरस्कार ज्युडो खेळाडू साई&श्वरी कोडचवाडकरला देण्यात आला. साई&श्वरीला ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. साई&श्वरी ही बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल येथे सराव करीत असून तिने राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर अनेक सुवर्ण पदकासह पारितोषिक पटकाविला आहेत. तिच्या या कामगिरीबद्दलच हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. तिला आई-वडिलांचे व गुरुजनांचे प्रोत्साहन लाभत आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.