महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बसवन कुडची क्रिकेट स्पर्धेत साईराम स्पोर्ट्स विजेता

09:59 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

बसवन कुडची येथील श्रेयांश वारियर्सने श्री गणेश चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा हाफपीच व गावमर्यादित असल्याने गावातील 24 संघांनी यामध्ये भाग घेतला होता. साईराम स्पोर्ट्सने श्री कलमेश्वर स्पोर्ट्सला नमवत प्रथम क्रमांक पटकावला, कलमेश्वर स्पोर्ट्सने द्वितीय क्रमांक पटकावला तर सुदर्शन स्पोर्ट्सने तिसरा क्रमांक पटकावला. शुक्रवारी सुरू झालेल्या स्पर्धेची रविवारी सांगता झाली. स्पर्धा पाहण्यासाठी गावातील क्रिकेटप्रेमींनी जबरदस्त गर्दी केली होते. यावेळी साई जोडगुंडे, श्री. जोडगुंडे, संजू चौगुले, सुनील दिवटे, बस्सू भडाचे, कलमेश बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर, सुरज बेडका, पिराजी बेडका, जोतिबा मांडीवाळ, जोतिबा मुतगेकर, पुंडलिक कडेमनी, श्रेयांश वारियर्स तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.जोतिबा हम्मनावर यांनी लाईट व साऊंडची व्यवस्था केली होती. राजू चौगुले व शुभम चौगुले यांनी समालोचक म्हणून काम पहिले. विशाल बेडका व यल्लाप्पा दिवटे यांनी पंच म्हणून काम पहिले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article