For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपाप संघाकडे साईराज निमंत्रितांचा चषक

10:34 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आपाप संघाकडे साईराज निमंत्रितांचा चषक
Advertisement

मालिकावीर फरदीन काजी दुचाकीचा मानकरी: केआर शेट्टी उपविजेता

Advertisement

बेळगाव : आक्रमक फलंदाजी व उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर आपाप संघाने राहुल के आर शेट्टी किंग्स रायगड संघाचा 26 धावांनी पराभव करून साईराज चषकासह  1 लाख 61 हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले. तर आपाप संघाच्या फरदीन काझीला अंतिम सामन्यातील सामनावीर व स्पर्धेतील मालिकाविराने गौरवताना दुचाकी वाहनाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. व्हक्सिन डेपो मैदानावर साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंित्रतांच्या साईराज चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केआर शेट्टी किंग्ज रायगड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना आपाप स्पोर्ट्सने 10 षटकात 5 गडी बाद 124 धावा केल्या. त्यात फरदीन काजीने 2 षटकार, 3 चौकारासह 35 धावा,  कृष्णा गवळीने 5 चौकार व एक षटकारसह 34, तर प्रथमेशने एक चौकार व 3 षटकारासह नाबाद 24 धावा केल्या. राहुल केआर शेट्टी रायगड संघातर्फे इरफान व सत्यम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पहिल्या डावात राहुल के आर शेट्टी किंग्स रायगड संघाने 10 षटकात 2 गडी बाद 128 धावा करून चार धावांची आघाडी पहिला डावात मिळवली. त्यात सुनील चावरीने 6 षटकार व  2 चौकारासह 56 धावा करून अर्धशतक झळकविले. त्याला शाहिद शेखने 4 षटकार व 2 चौकारासह 30 तर थॉमस डायसने 3 षटकारासह नाबाद 29 धावा केल्या. आपापतर्फे नाझीर व धनंजय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या डावात आपाप स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 8 गडी बाद 111 धावा केल्या. त्यात फरदीन काजीने 5 षटकार व 2 चौकाŠसह 48 तर बबलू पाटील 6 षटकारासह नाबाद 44 धावा केल्या. के आर शेट्टी तर्फे इरफानने 4  तर सोम सिंगने 2 गडी बाद केले.

112 धावांचे उद्दिष्ट घेऊन खेळताना राहुल के आर शेट्टी रायगड संघाने 10 षटकात 9 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात अजित मोहितेने 3 षटकारासह 22, शाहिद शेखने 2 षटकार एक चौकाराचा 21 तर सागरने 2 षटकार एक चौकारासह 20 धावा केल्या. आपोआप तर्फे भूषण गवालीने 17 धावात 3 तर राज सिंग व धनंजय यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, मलिकार्जुन जगजंपी, नारायण फगरे, विक्रम देसाई, शितल वेसणे, दिलीप पवार, चंदन कुंदरनाड, विजय धामणेकर, महेश फगरे, गजानन फगरे, रोहित फगरे, राजेश जाधव, जाकी मस्करेन्स, अमर सरदेसाई, रमेश रायगोड, अमर नाईक, प्रणय शेट्टी निखिल एम सी, विनायक देवण आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आपाप संघाला 1 लाख 61 हजार 111 रुपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या राहुल के आर शेट्टी किंग्स रायगड संघाला 1 लाख 11 हजार 111, रुपये रोख आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक बक्षिसे अंतिम सामन्यातील सामनावीर फरदीन काजी आपाप, इम्पॅक्ट खेळाडू इमरोज खान आपाप, उत्कृष्ट संघ नील बॉइज हिंडलगा, स्पर्धेतील उत्कृष्ट झेल बिलाल रजपूत के आर शेट्टी, उत्कृष्ट यष्टीरक्षक अजित मोहिते के आर शेट्टी, उत्कृष्ट फलंदाज करण मोरे मोहन मोरे, उत्कृष्ट गोलंदाज इरफान मलिक केआर शेट्टी, याना चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तर मालिकावीरासाठी जगजंपी बजाजकडून देण्यात येणाऱ्या दुचाकी वाहन आपापच्या फरदीन काजी यांनी पटकाविला. त्याला मल्लिकार्जुन जगजंपी  व इतर मान्यवरांच्या हस्ते दुचाकी व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून सचिन सांगेकर मुंबई, सुनील पाटील कोल्हापूर व अनंत माळवी बेळगाव यांनी काम पाहिले. स्कोरर म्हणून  गणेश मुतकेकर, कल्पेश संभोजी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन चंद्रकांत सेटे मुंबई, नसीर पठाण, आरिफ बाळेकुंद्री, अभी असलकर, विजय रेडेकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराज स्पोर्ट्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.