For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा स्पोर्ट्स कोल्हापूरकडे साईराज चषक

10:05 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
मराठा स्पोर्ट्स कोल्हापूरकडे साईराज चषक
Advertisement

बेळगाव : मयुरेश चौगुलेच्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर मराठा स्पोर्ट्स शिवाजी तरुण मंडळ कोल्हापूरने किसन कंग्राळकर पीटीएम कोल्हापूरचा सडनडेथमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव करून साईराज फुटबॉल चषक पटकाविला. मयुरेश चौगुले स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून दुचाकी वाहनाचा मानकरी ठरला. टिळकवाडी येथील सुभाष लेले मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळने आयबीसीटी बेळगावचा 3-0 असा पराभव केला. कोल्हापूरतर्फे संकेत साळुंखेने 2, संकेत एस.ने 1 गोल केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात किसन कंग्राळकर पीटीएम कोल्हापूरने दीलबहार कोल्हापूरचा टायब्रेकरमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 45 वा मिनिटाला पीटीएमच्या ओंमकार मोरेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास केवळ 30 सेकंद बाकी असताना दिलबहारच्या राजेंद्रच्या पासवर पवन माळीने हेडद्वारे बरोबरीचा गोल करून सामन्यात रंगत निर्माण केली. दोन्ही संघाचा गोलफलक बरोबर राहिल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये पीटीएमने 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. सायंकाळी अंतिम सामन्याचे उद्घाटन पुरस्कृकर्ते महेश फगरे, जॉकी मस्कर्नस, अमर सरदेसाई, विठ्ठल गवस, किरण एस.टी., विनोद तनन आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून अंतिम सामन्याला सुरूवात करण्यात आली.

Advertisement

12 व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंमकार पाटीलने मारलेला वेगवान फटका मराठा स्पोर्टस गोलरक्षक मयुरेश चौगुलेने उत्कृष्ट अडविला. 18 व्या मिनिटाला शिवाजी तरूण मंडळच्या बुवाफुले प्रिन्सने जोरदार फटका गोलमुखात मारला होता. पीटीएमचा गोलरक्षक विशाल कुरणेने आपल्या डावी झुकत उत्कृष्ट अडविला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला बुवाफुले प्रिन्सने जोरदार फटका मारला होता. तो फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 42 व्या मिनिटाला पीटीएमच्या ओंमकार मोरेने गोल करण्याची सुवर्ण संधी वाया घालविली. 58 व्या मिनिटाला शिवाजी तरूण मंडळच्या संकेत साळोखेने गोल करण्याची सुवर्ण संधी दवडल्याने निर्धारीतवेळेत दोन्ही संघाचा गोलफलक कोराच राहिला. पंच सुनील पवार यांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये पीटीएम व शिवाजी तरूण मंडळ संघाचा गोलफलक 4-4 असा बरोबरीत राहिला. पीटीएमतर्फे अक्षय अहमद, प्रतिक बदामी, ओंमकार पाटील, प्रथमेश हेरेकर यांनी गोल केले. तर शिवाजी तरूण मंडळतर्फे रोहन अदीक, करण बांद्रे, संकेत साळोखे, गोपी साळोखे यांनी गोल केले. यानंतर पंचानी सडनडेथ नियमाचा वापर केला. त्यामध्ये मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळ कोल्हापूरने 6-5 असा गोलफरकाने पराभव केला.

शिवाजी तरूण मंडळतर्फे सय्यद हरदीप, सिध्देश यांनी गोल केले. पीटीएमतर्फे ओंमकार जाधवने गोल केला. शेवटच्या फटका पीटीएमच्या ओंमकार मोरेने मारलेला फटका शिवाजी तरूण मंडळचा गोलरक्षक मयुरेशने आपल्या उजव्या बाजूला हवेत झोकून देऊन चेंडू अडवत विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. सामन्यानंतर बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे देवरत जगजंपी, नारायण फगरे, महेश फगरे, जॉकी मस्कर्नस, विजय जाधव, प्रणय शेट्टी, विठ्ठल गवस, किरण एस.टी, विनोद तनन, विजय धामणेकर, अमर नाईक, अमर सरदेसाई यांच्याहस्ते विजेत्या मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळ संघाला 1 लाख रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या किरण कंग्राळकर पीटीएम कोल्हापूर संघाला 50 हजार रूपये रोख, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट संघ सेसा गोवा, उत्कृष्ट फारवर्ड ओंमकार (पीटीएम), उत्कृष्ट डिफेंडर अक्षय (पीटीएम), उत्कृष्ट मीडफिल्डर संकेत साळोखे (शिवाजी तरूण मंडळ), उत्कृष्ट गोलरक्षक विशाल (पीटीएम) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू शिवाजी तरूण मंडळ कोल्हापूरचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेला जगजंपी बजाज यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या दुचाकी पल्सर वाहन व चषक देऊन गौरविण्यात आले. मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळ कोल्हापूर संघ चालक प्रफुल पाटील, निखिल पाटील, विकी गवी, शिवराज जाधव, रवी पुरेकर यांचाही खास सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून कोल्हापूर स्वॉकर संघटनेचे पंच सुनील पवार, योगेश हिरेमठ, संतोष पवार, गौरव माने, अवधुत गायकवाड, गजानन मनगुतकर, ऋशीकेश दाबाडे यांनी काम पाहिले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराज स्पोर्टस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.