सर्वात धोकादायक समुद्र येथे जाण्यास घाबरतात खलाशी
शांत समुद्र पाहण्यास सुंदर वाटतो, परंतु जेव्हा त्याचे विक्राळ रुप पहायला मिळते, तेव्हा मोठमोठ्या खलाशांची बोबडी वळते. जगात 50 हून अधिक समुद्र असून यातील एक समुद्र अत्यंत धोकादायक मानला जातो. या समुद्रात जाण्यास मोठमोठे खलाशी घाबरत असतात.
उत्तर समुद्र सर्वात धोकादायक मानला जातो. नॉर्वे, स्कॉटलंड, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड आणि जर्मनी या देशांना नकाशावर पाहिल्यावर त्यांच्यादरम्यान एक निळ्या रंगाची जागा दिसेल अणि तोच उत्तर समुद्र आहे. या समुद्रातील पाणी अत्यंत अशांत मानले जाते. अनेक खलाशी हा समुद्र ओलांडण्यास देखील घाबरत असतात. याचे कारण या समुद्रात आखातातून येणारे उष्ण वारे, आर्क्टिकच्या दिशेहून येणारे थंड वारे आहे. हे उष्ण आणि थंड वारे परस्परांमध्ये मिसळले गेल्यावर ते अत्यंत तीव्र अन् शक्तिशाली होतात. तसेच उंच लाटा देखील निर्माण होत असतात. या लाटांमध्ये जहाज चालविणे अत्यंत अवघड काम आहे. येथील वाऱ्यांचा प्रभाव पाण्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या भागात दाट धुके देखील निर्माण होत असते, यामुळे लोकांना दूरपर्यंतचे पाहता येत नाही. केवळ हवामानच नव्हे तर या भागात सागरी चाचेही टपून बसलेले असतात. जे जहाजांना कब्जात घेत त्यावरील सामग्री लुटत असतात.
हा सागरी मार्ग अत्यंत व्यग्र मार्ग असून तो व्यापारासाठी वापरला जातो. मोठमोठ्या देशांदरम्यान हा मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येत असतात.