सैफ अली खान रिमेकमध्ये झळकणार
दमदार असणार भूमिका
सैफ अली खान सध्या अनेक चित्रपटांचे चित्रिकरण करत आहे. यात रेस 4 यासारखे चित्रपटही सामील आहेत. आता सैफ हा दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. अभिनेता नानीच्या चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. नानीच्या या चित्रपटाचे नाव ‘गँग लीडर’ होते आणि तो 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.
सैफ अली खानने यापूर्वी अनेक अॅक्शनपटांमध्ये काम केले आहे. तर मागील काही काळात तो अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला आहे. यामुळे तो पुढील काळात नायकाच्या भूमिकेत दिसून येईल. सैफ हा पत्नी करिनासोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असतो. दोघेही सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. या रिमेकमध्ये सैफ अली खानसोबत करिना कपूर दिसून येणार असल्याची चर्चा असली तरीही याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.