महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुलकर सलमानसोबत पुन्हा झळकणार सई

06:55 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुलकर सलमान स्वत:चा चित्रपट ‘लकी भास्कर’चे समीक्षकांकडून कौतुक केल्याने आनंदी आहे. वेंकी एटलुरी दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर शिवकार्तिकेयन-सई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट अमरनशी स्पर्धा करावी लागली होती. तर आता दुलकर सलमान आणि सई पल्लवी लवकरच एकत्रित झळकणार आहेत.

Advertisement

तेलगू चित्रपट ‘आकाशम लो ओका तारा’मध्ये सई पल्लवी नायिकेची भूमिका साकारणार आहे. पवन सादिनेनी यांच्याकडून या चित्रपटाचे दिग्दर्शन होणार असून याचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. दुलकर सलमान आणि सई यांनी यापूर्वी 2016 मध्ये प्रदर्शित रोमँटिक थ्रिलर चित्रपट कालीमध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

Advertisement

सई आणि दुलकर सलमान हे दक्षिणेतील आघाडीचे कलाकार आहेत. दोघांच्या जोडीचा कसदार अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना पुन्हा मिळणार आहे. दुलकर सलमानचा लकी भास्कर या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तर अमरन चित्रपटातील स्वत:च्या भूमिकेकरता सईने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article