‘द सिक्रेट्स ऑफ शिलेदार्स’मध्ये सई ताम्हणकर
द सिक्रेट्स ऑफ शिलेदार्स या सीरिजची रोमांचक कहाणी आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. याचा ट्रेलर जारी करण्यात आला असून यात एका अद्भूत प्रवासाची झलक दिसून येते. या कहाणीत प्रत्येक धागा एक नवे रहस्य समोर आणतो आणि प्रत्येक शोध आणखी एका रहस्याकडे घेऊन जातो. कहाणीची मुख्य व्यक्तिरेखा रवि (राजीव खंडेलवाल) स्वत:ची खरी ओळख आणि रहस्यांची उकल करण्यासाठी प्रवासावर निघाला असून तेथे त्याचा सामना अनेक आव्हानांशी होतो. हा रोमांचक शो 31 जानेवारीपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
द सिक्रेट्स ऑफ शिलेदार्सचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने पेल आहे. ही एक रोमांचक सीरिज असून ती ‘प्रतिपाष्चंद्र’ नावाच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे. या सीरिजमध्ये सई ताम्हणकर, गौरव अमलानी आणि आशीष विद्यार्थीही दिसून येतील. ही सीरिज आधुनिक जगतातील असली तरी इतिहासात बुडालेली आहे. साहस, रोमांच आणि ट्रेजर हंटने युकत ही कहाणी भारावून टाकेल असा दावा सरपोतदारने केला आहे.
द सिक्रेट्स ऑफ शिलेदार्स यासारख्या उत्तम शोचा हिस्सा होणे प्रत्येक कलाकारासाठी अभिमानास्पद आहे. या कहाणीला प्रामाणिकपणे पडद्यावर साकारणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक अनुभव राहिला. ही कहाणी प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणार आहे. राजीव खंडेलवालसोबत काम करण्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे उद्गार सई ताम्हणकरने काढले आहेत.