महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साई सुदर्शन सरेत दाखल

06:10 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या इंग्लिश काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळणाऱ्या सरे संघामध्ये साई सुदर्शनचे पुनरागमन झाले आहे. 22 वर्षीय साई सुदर्शनने गेल्या वर्षी इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघासमवेत करार केला होता. गेल्या वर्षीच्या इंग्लिश काउंटी हंगामात साई सुदर्शनने 2 सामन्यात 116 धावा जमविल्या होत्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. साई सुदर्शनच्या अर्धशतकामुळे सरे संघाने 22 व्यांदा इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते. चेन्नईच्या साई सुदर्शनने 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना फलंदाजी सातत्य दाखवताना 12 सामन्यातून 527 धावा जमविल्या होत्या. गेल्या वर्षी साई सुदर्शनने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले होते. त्याने या वनडे मालिकेत 3 सामन्यात 127 धावा जमविल्या होत्या. या मालिकेत साई सुदर्शनने 2 अर्धशतके नोंदविली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये साई सुदर्शनने 29 डावांत 1118 धावा जमविल्या आहेत.

Advertisement

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article