महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साई स्पोर्ट्स क्लब, साईराज वॉरियर्स संघ विजयी

10:36 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगावटी टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत साई फार्म स्पोर्ट्स क्लबने  भाटे वॉरिअर संघाचा  व साईराज वॉरियर्सने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. रामलिंग पाटील(साई स्पोर्ट्स), आदर्श माळी (साईराज) याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात साई फॉर्म स्पोर्ट्स क्लब संघाने भाटे वॉरिअर संघाचा 4 गड्यांनी पराभव केला. भाटे वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 18.1 षटकात सर्व बाद 107 धावा केल्या. त्यात वैष्णव संगमित्राने 7 चौकार व एक षटकारांसह 60, राहुल वेर्णेकरने 16 धावा केल्या. साई फार्म  स्पोर्ट्स क्लब तर्फे रामलिंग पाटीलने 12 धावांत 3, मिलिंद चव्हाण वैभव कुरीबागी, आनंद कुंभार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 16.1 षटकात 6 गडीबाद 111 धावा करून सामना 4 गडीयांनी जिंकला. त्यात रामलिंग पाटीलने 2 ष्गटकार व 2 चौकारांसह 44, गणेश कंग्राळकरने 17 धावा केल्या. भाटे वॉरियर्स तर्फे हार्दिक ओझाने 3, ध्रुव देसाईने 2 गडी बाद केले.

Advertisement

साईराज वॉरियर्स संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचा 2 गडी व तीन चेंडू राखून पराभव केला. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने  प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 127 धावा केल्या. त्यात पार्थ पाटीलने 2 षटकार 2 चौकारांसह 32, मदन बेळगावकरने 2 षटकार 2 चौकारांसह 29, प्रवीण हिरेमठने 27 धावा केल्या. साईराज वॉरियसर्फे संतोष सुळगे-पाटीलने 14 धावांत 3, रब्बानी दफेदार, ओमकार वेर्णेकर व सुधन्वा कुलकर्णी यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले.प्रत्युत्तरा दाखल खेळताना साईराज वॉरिअर संघाने 19.3 षटकात 8 गडीबाद 128 धावा जमवत सामना 2 गड्यांनी जिंकला. त्यात आदर्श माळीने 3 चौकार व 4 षटकारांसह 43, सूधन्वा कुलकर्णीने 24, ओंकार वर्णेकरने 15 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस तर्फे मदन बेळगावकरने उत्कृष्ट फिरकी मराकरत चार षटकात फक्त सहा धावा देत 3 गडीबाद केले. पार्थ पाटील यांनी 2 तर केतज कोल्हापुरे, विनोद देवडीगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुणे ऋतुराज भाटे नारायण आगसगेकर व महांतेश देसाई यांच्या हस्ते सामनावीर रामलिंग पाटील व इम्पॅक्ट खेळाडू वैष्णव संगमित्रा यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई, सुशांत चव्हाण व शिवानंद राठोड यांच्या हस्ते सामनावीर आदर्श माळी व इम्पॅक्ट खेळाडू मदन बेळगावकर यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article