कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : साताऱ्यात सहस्त्रचंडी महायज्ञ समारोप; मंत्री चंद्रकांत पाटीलांनी घेतले देवीचे दर्शन !

03:05 PM Oct 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

       साताऱ्यात सहस्त्रचंडी महायज्ञाचा समारोप सोहळा

Advertisement

सातारा : "साताऱ्यातील पंचपाळी हौद येथील दुर्गामाता मंदिरात सुरू असलेल्या सहस्त्रचंडी महायज्ञाचा आज समारोप सोहळा पार पडला. या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः मंदिरात हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले."

Advertisement

"गुरुवार रात्री आठ वाजता चंद्रकांत पाटील साताऱ्यातील पंचपाळी हौद येथील दुर्गामाता मंदिरात दाखल झाले. त्यांनी महायज्ञाच्या स्थळी उपस्थित राहून देवीची पूजा-अर्चा केली आणि आयोजकांकडून सहस्त्रचंडी महायज्ञाच्या संपूर्ण सोहळ्याची माहिती जाणून घेतली."

" सहस्त्रचंडी महायज्ञामुळे परिसरात धार्मिकतेचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे." "या सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मंत्रोच्चार, आरती आणि देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता."

Advertisement
Tags :
_satara_news#Maharastra#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediabjpchandrakant patildurgamatanavaratri 2025satara
Next Article