कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन

11:21 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हस्तकला कारागिरीचे देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व -खासदार शेट्टर

Advertisement

बेळगाव : हस्तकला व हस्त कारागिरीचे आपल्या भारत देशामध्ये फार महत्त्व आहे आणि या कलेला महत्त्व देऊन बेळगावकरांनी सहारा हँडलूम, हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व हस्तकला कारागिरीला महत्त्व देऊन खरेदी करावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचे सदाशिवनगर येथे सोमवारी सकाळी उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी माजी आमदार व राज्य जनरल सेव्रेटरी पी. राजीव, भाजप बेळगावचे अध्यक्ष सुभाष पाटील, संजय पाटील, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम, सहाराचे आयोजक महंमद अवैस, नजीब व गुड्डूभाई, हॉकीचे सेव्रेटरी सुधाकर चाळके उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी यश कम्युनिकेशनचे संचालक व आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाची माहिती व प्रास्ताविक केले व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी फीत कापून व दीप प्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन केले.  खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, अशा प्रकारची प्रदर्शने भरविणे फार महत्त्वाचे असते. कारण आजच्या पिढीला हस्तकला कारागिरीची माहिती होईल व हस्तकला कारागिरांना त्याचे श्रेय मिळेल हे महत्त्वाचे आहे. देशातील प्रत्येक राज्यामध्ये वेगळी कलाकुसर आहे. ही कलाकुसर या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला पाहावयास मिळते.

या प्रदर्शनात हँडमेड गिफ्ट्स, हॅँडमेड प्रोडक्ट्स, ज्वेलरी, टेराकोटा, होम डेकोर, खुर्जा क्रॉकरी, डिझायनर क्लॉथ, वाराणसी साडी, कोलकाता, आसामी साडी व क्लॉथ, भागलपूर साडी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कार्पेट, पायपोस, हर्बल प्रॉडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक,  कश्मिरी शाल व सूट, खादी कापड, खादी हॅण्डलुम, गुजराती पर्स, किचन वेयर, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी-शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडीज कुर्ती, गाऊन, क्रॉकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, सॉफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बँगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडीज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑईल तिऊपूर टी-शर्ट, पायजमा, ट्रॅक सूट, खेकडा बेडशीट्स, पुस्तक प्रदर्शनात शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात देशभरातील 100 हून अधिक स्टॉलधारकांनी भाग घेतला आहे. सदर प्रदर्शन सहारा आर्ट अँड क्राफ्ट आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article