सहजा, श्रीवल्ली भारताचे आव्हानवीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एआयटीएने सोमवारी 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान बेंगळूर येथे होणाऱ्या बिली जीन किंग कप प्लेऑफसाठी नंबर वन सहजा यमलापल्लीच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय संघाची घोषणा केली.
रँकिंगनुसार, राष्ट्रीय निवड समितीने सहजा (347), श्ा़dरीवल्ली भामिदिपती (374), अंकिता रैना (447), रिया भाटिया (499) आणि दुहेरी स्पेशालिस्ट प्रार्थना ठोंबरे (131) यांची निवड केली. वैदेही चौधरी राखीव खेळाडू असेल. अलिकडेच गुरूग्राममधील आयटीएफ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या झील देसाई आणि श्रुती अहलावत यांना प्रशिक्षण शिबिराचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारताला स्लोव्हेनिया आणि नेदरलँड्ससह गट जी मध्ये स्थान देण्यात आले आहे. गटातील विजेत्याला 2026 च्या पात्रता फेरीत बढती दिली जाईल तर इतर दोन संघ पुढील वर्षी गट आयमध्ये भाग घेतील. विशाल उप्पल संघाचा कर्णधार असेल तर राधिका कानिटकर प्रशिक्षक असतील.