For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलांसाठी सर्वात सुरक्षित देश

06:40 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुलांसाठी सर्वात सुरक्षित देश
Advertisement

घरातून एकटेच पडतात बाहेर

Advertisement

सर्वसाधारणपणे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेविषयी पालकांना चिंता लागून राहिलेली असते. मुलांना एकट्याने कुठे पाठवण्यास आपण घाबरत असतो. त्यांच्यावर एखादे काम सोपविणे सोडा, त्यांना एकट्याने कुठे जाऊ देण्याची कल्पनाही केली जात नाही. परंतु एका देशात 4-5 वर्षांची मुलेही कुठेही एकटी फिरू शकतात. जपान हा मुलांसाठी सर्वात सुरक्षित देश मानला जातो.

ज्या वयातील मुलांना भारतात उचलून घेऊन रस्ता ओलांडावा लागतो, त्या वयात तेथील मुले एकटीच बाजारात पोहोचतात आणि आवश्यक शॉपिंग करून घरी परततात. जपानमध्ये छोट्या मुलांना सहजपणे घराबाहेर जाऊ दिले जाते. तेथील मुले सुपरमार्केटमधून शॉपिंग करत, फ्रूट ज्यूस तयार करत आणि रस्ता ओलांडताना दिसून येतात. हे सर्व काही ही मुले आईवडिलांच्या मदतीशिवाय करत आहेत.

Advertisement

घराच्या सामग्रीपासून छोटी-मोठी  शॉपिंग करण्यास तेथील मुले अजिबात घाबरत नाही, कारण जपानमधील महिला त्यांना रोखत नाहीत, उलट त्यांना प्रोत्साहनच देतात. जपानच्या शाळांमध्ये देखील मुलांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले जातात. तेथील शाळेची साफसफाई करणे आणि शारीरिकपासून मानसिक शिस्तीचे पालन केले जाते.

Advertisement
Tags :

.