महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हसत्या-खेळत्या चेहऱ्यांमध्ये लपलंय दु:ख

06:03 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोशल मीडिया स्टार ठरले वृद्धाश्रमातील आजीआजोबा

Advertisement

हा काळा सोशल मीडियावर रील्स तयार करण्याचा आहे. कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल हे कुणीच सांगू शकत नाही. याचदरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूच्या मदुराईमध्ये तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ एका वृद्धाश्रमातील होता, याच्या रीलला इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात ह्यूज मिळाल्या आहेत. परंतु येथे रील्स तयार करण्याचे सत्र कधी सुरू झाले हे जाणून घेणे रंजक ठरणार आहे.

Advertisement

संबंधित व्हिडिओ देणगीदारांचे आभार मानण्यासाठी तयार करण्यात आला होता. यानंतर आणखी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यात वृद्ध बागेत काम करत होते. मग त्यांच्या समन्वयकाने वृद्धांना एका गाण्यावर नृत्य करणे शिकविले, त्यांच्या रीलवर एक दशलक्षापेक्षा अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. यानंतर वृद्धांनी आणखी रील्स तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रील्समुळे या  वृद्धांची शारीरिक हालचाल देखील होते, अशी माहिती वृद्धाश्रमाच्या केयरटेकर नागलक्ष्मी यांनी दिली आहे.

आता ही वृद्धमंडळी स्वत:च्या रील्सद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणू पाहत आहेत. परंतु येथे राहत असलेल्या वृद्धांची कहाणीच अत्यंत दु:खदायी आहे. कुणाच्या परिवारात देखभाल करणारा कुणीच नव्हता. तर कुणाला त्याच्या अपत्यांनीच घरातून बाहेर काढले होते. या वृद्धाश्रमाचे इन्स्टाग्रामवर 1.44 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. येथे अनेक वृद्धांचे कित्येक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. स्वत:चे रील्स वायरल झाल्याने सर्व वृद्ध अत्यंत आनंदी आहेसत. तर इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचा आकडा 1 लाखाहून अधिक झाल्यावर या वृद्धांनी केक कापून आनंद व्यक्त केला.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article