महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सद्गुरूंचे बोलणे सहज बोलता हितोपोदेश असे असते

06:24 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंत म्हणाले, उद्धवा बद्रिकाश्रमात गेल्यावर तुला अनेक तीर्थे आढळतील. परंतु त्यातील अलकनंदा सगळ्यात महत्त्वाची आहे. तिच्या नुसत्या दर्शनाने सर्व दोषांचा नाश होतो. तेव्हा प्रथम अलकनंदेत स्नान कर. तू कितीही विद्वान, आत्मज्ञानी असलास तरी तेथील लोकांना तुझा परिचय नाही. त्यामुळे तुझ्या राहणीवरून ते तुला जोखायचा प्रयत्न करतील कारण माणसाच्या राहणीवरती लोकांचे बारकाईने लक्ष असते आणि त्यावरून ते त्या माणसाबाबतचे मत बनवतात. हे लक्षात घेऊन तेथील तुझी राहणी कशी असावी ते सांगतो. वस्त्रांचा त्याग करून वल्कले परिधान करायचा परिपाठ ठेव. फलाहार कर. लोकसंग्रहासाठी संपूर्ण निस्पृहतेने रहा. तू ज्ञानविज्ञानसंपन्न असल्याने तू सर्वांना समान दर्जाची वागणूक देतोस, हे लोकांच्या लक्षात आणून दे. तू त्यांना इंद्रियसंयम करून दाखव. तसेच तुझ्यातील सुशीलता इतरांना दाखवून दे. तुला माझ्याकडून जे ज्ञान मिळाले आहे त्याचे अनुसंधान राखून लोकांना त्याचे महत्त्व पटवून दे.

Advertisement

ज्ञानविज्ञानसंपन्न लोकांनी समाजात मिसळून त्यांना आत्मज्ञानाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. त्यासाठी लोकसंग्रह करणे आवश्यक आहे. ह्याप्रमाणे तू व्रतस्थ होऊन राहिल्यावर, खुपजण तुला शरण येतील. तेव्हा त्यांचा उद्धार करणे हे तुझे कर्तव्य असेल कारण ज्याला ब्रह्मज्ञान झालेले आहे तो स्वत: उद्धरून जातो पण ते ज्ञान त्याने इतरांना न देऊन त्यांचा उद्धार केला नाही तर तो भ्याड ठरतो. शिष्य आपल्याला ब्रह्मज्ञान कधी होईल म्हणून तळमळतो आहे आणि गुरु भलतेसलते काही बडबड करत आहे. म्हणजे घरच्याघरीच चुकामुक होत आहे असे समजावे.

ज्याला ब्रह्मज्ञान झालेले आहे त्याने दुसऱ्याच्या चित्ताचे प्रबोधन करणे ही साधी गोष्ट नाही कारण तसे करता येण्यासाठी त्याने स्वत: तसे आचरण करून दाखवावे लागते आणि त्यासाठी ब्रह्मज्ञान त्याच्या पूर्ण पचनी पडलेले असावे लागते. म्हणून जो दुसऱ्याच्या चित्ताचे प्रबोधन करू शकतो त्याच्या ठायी ब्रह्मज्ञानाची पूर्ण निष्पत्ती झाली असे निश्चितपणे म्हणता येते. स्वत: हा भवसागर तरुन जात असताना जो इतरांनाही तारतो त्याच्या ज्ञानाची थोरवी किती असेल ह्याची कुणाला कल्पना येत नाही. असे अगाध थोरवी असलेले ज्ञान उद्धवा मी तुला दिलेले आहे तेव्हा ते आचरणात आणून लोकांना त्याचे महत्त्व पटवून दे. तू आधी आचरण करून त्यांना सांगितलेस की, त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल आणि तेही तुझ्याप्रमाणे आचरण करतील. असे केल्याने तुझ्याबरोबर त्यांचाही उद्धार होईल. ब्रह्मज्ञानाचे एक वैशिष्ट्या असे आहे की, जोपर्यंत सद्गुरूने शिष्याला दिलेल्या ब्रह्मज्ञानाने अनेकांचा उद्धार होत नाही तोपर्यंत सद्गुरूंच्या देणगीची परिपूर्णता होत नाही हे निश्चित आहे. एखाद्या झाडाची फळे पिकली की, त्या झाडाला माझी फळे पिकली आहेत हे कुठे जाऊन सांगावे लागत नाही. त्या फळांचा मंद सुगंध, मनमोहक रंग ही फळे पिकली आहेत हे आसमंतात जाहीर करत असतो. त्यामुळे पक्षी आपोआपच त्या झाडाकडे फळांचे सेवन करण्यासाठी धाव घेत असतात, काहीतर त्या झाडाच्या आश्रयाने वस्ती करून राहतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी मनुष्याच्या आचरणातूनच त्याची कीर्ती चोहीकडे पसरत असते आणि त्याच्यापाशी त्याचा शिष्य परिवार न बोलावताही गोळा होत असतो. त्याच्या बोलण्यातला शब्द आणि शब्द ते टिपून घेत असतात कारण त्यांचे बोलणे म्हणजे सहज बोलता हितोपोदेश अशा स्वरूपाचे असते. त्याच्या बोलण्यात लेशमात्रही अहंकार नसतो. असं जरी असलं तरी आपण कुणाला तरी ब्रह्मज्ञानाचा उपदेश देतोय ह्या कल्पनेने सद्गुरुना ब्रज्ञानाचा अहंकार होऊ शकतो हे भगवंतांनी सांगितल्यावर उद्धवाला आश्चर्य वाटले.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article