महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्य संघात साधना होसूरकरची निवड

12:18 PM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कबड्डीपटू साधना होसूरकर हिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी राज्य संघात निवड करण्यात आली आहे. तिचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नुकतीच चिकोडी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. यावेळी बेळगाव जिल्हा संघातील ताराराणी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आपली कबड्डीतील चुणूक दाखविली होती. त्यात साधना होसुरकर, आरती तोरगल, सोनाली धबाले या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर साधना होसुरकर हिची कर्नाटक राज्य संघातील निवड करण्यात आली आहे. आता ती राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत ती कर्नाटक कबड्डी संघातून खेळणार असून, हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेत खेळणार आहे. साधना होसूरकर हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात याला. यावेळी प्राचार्य अरविंद पाटील, संचालक परशराम गुरव, संचालक शिवाजी पाटील, मुख्याध्यापक राहुल जाधव, मुख्याध्यापक के. व्ही. कुलकर्णी, पालक महेश होसुरकर, कबड्डी कोच भरमाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article