महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सद्दाम हुसैन भाऊ, जॉर्जिया बुश बहिण

06:05 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओसामा विनलादेनच्या कहाणीत रंजक ट्विस्ट

Advertisement

सुमारे 4 शतकांपूर्वी स्वत:च्या क्लासिक ड्रामा रोमियो अँड जुलियटला लिहिताना महान नाटककार विलियम शेक्सपियरने ‘नावात काय ठेवले आहे’ असा प्रश्न सामील केला होता. नावाला मानवी जीवनाशी एक साधारण किस्सा ते मानत असावेत. परंतु सध्याच्या काळात असे नाही. वर्तमान काळात जर कुणी नावात काय ठेवले आहे असे विचारले तर चकित करणारी उत्तरे मिळतील. नावातच सर्वकाही असल्याचे उत्तरही मिळू शकेल.

Advertisement

एका परिवारात ओसामा बिन लादेन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि सद्दाम हुसैन एकाच मेजवर जेवत असतील आणि गप्पा मारताना दिसून येत असतील तर तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. परंतु असे घडत असून पेरू या देशात अजब प्रकार घडतोय.

अनेक लोक प्रसिद्धीच्या झोतात राहू इच्छितात. अशाप्रकारचे लोक वारंवार चर्चेत येणारी कृत्यं करत असतात. हेच लोक सोशल मीडिया सेंसेशन देखील ठरतात. पेरूच्या एका व्यक्तीला प्रसिद्धीच्या झोतात राहणे पसंत होते. याचमुळे त्याने दोन मुलांना निर्दोष लोकांचा जीव घेणाऱ्या हुकुमशहांची नावे दिली आहेत. तर या व्यक्तीच्या मुलीला त्याने अमेरिकन अध्यक्षांवर नाव दिले आहे.

या व्यक्तीच्या मुलाचे नाव ओसामा विन लादेन (स्पॅनिशमध्ये ‘बी’ आणि ‘व्ही’ अक्षरांच्या उच्चारणाच्या समानतेमुळे) असून तो सध्या पेरूवियन प्रायमेरा डिव्हिजनमध्ये युनियन कॉमर्सियो संघासाठी फुटबॉल खेळतोय. 21 वर्षीय या खेळाडूने अद्याप पेरूच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविले नसले तरीही तो अर्जेंटीना दक्षिण अमेरिकन चॅम्पियशनमध्ये स्वत:च्या देशाच्या अंडर15 संघासाठी मैदानात उतरला होता.

ओसामाचा जन्म 8/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाला होता. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याने हे हल्ले घडवून आणले होते. त्याचेच नाव एका व्यक्तीने स्वत:च्या मुलाला दिले आहे. ओसामा नाव असलेल्या या युवा फुटबॉलरच्या भावाचे नाव सद्दाम हुसैन आहे. त्याच्या नावामागील कहाणीही रंजक आहे. सद्दामचा जन्म हा इराक युद्ध शिगेला पोहोचले असताना झाला होता.

पेरूच्या  या ओसामाचा पिता इतका अजब होता की त्याने स्वत:च्या तिसऱ्या अपत्याचे नाव जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या नावावर ठेवण्याची इच्छा राखली होती. परंतु त्याची योजना तेव्हा विफल ठरली जेव्हा त्याच्या घरात मुलीचा जन्म झाला. मग या व्यक्तीने स्वत:च्या मुलीला जॉर्जिया बुश हे नाव दिले आहे.

ओसामा विन लादेनला त्याच्या अजब नावाविषयी विचारणा झाल्याने त्याने यामुळे मला कुठलीच समस्या नसल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी ओसामा बिन लादेनने ट्विन टॉवर्स पाडविले, त्यावेळी नाव फॅशनेबल होते. माझ्या भावाचे नाव सद्दाम हुसेन असल्याचे ओसामाने सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article