For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदानंद तानावडे यांना अजूनही सहा महिने मिळणार मुदतवाढ

03:59 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदानंद तानावडे यांना अजूनही सहा महिने मिळणार मुदतवाढ
Advertisement

पणजी : भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची मुदत चालू जून महिना अखेर संपत असली तरी त्यांना पुढे आणखी सहा महिने मुदतवाढ मिळणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्या मुदतीत भाजपच्या बूथ, मंडळ (मतदारसंघ)आणि जिल्हा पातळीवरच्या पक्षीय निवडणुका घेण्यात येतील, असा अंदाज आहे. भाजप प्रदेश अध्यक्षपदाचा उत्तराधिकारी वर्ष अखेरीस निवडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी पक्षात काही दावेदार असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा विचार पक्षीय पातळीवर सुरु आहे. जानेवारी 2020 मध्ये तानावडे यांची निवड झाली होती. ती तीन वर्षासाठी होती. त्यानंतर त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आता पक्षीय पातळीवररील निवडणूक प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज असून त्या निवडणुका घेण्यासाठी तीन महिने लागणार आहेत. त्यात बूथ, मंडळ आणि तालुका, जिल्हा पातळीवरील निवडणुकांचा समावेश आहे. त्या झाल्यानंतर सर्वांत शेवटी अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. अध्यक्षपद निवडण्यापूर्वी 11 सदस्यीय बूथ समिती या सर्व 40 मतदारसंघातून निवडल्या जाणार आहेत. त्या शिवाय 31 सदस्यीय मंडळ कमिटी निवडली जाणार आहे. हे सर्व झाल्यानंतर दोन जिल्हा समित्यांची निवडणूक होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.