मगरीचा दिला जायचा बळी
हजारो वर्षे जुन्या ममीमुळे रहस्याची उकल
अलिकडेच वैज्ञानिकांनी प्राचीन इजिप्तच्या मगरीच्या ममींच्या रहस्यांचा खुलासा करण्याचा दावा केला आहे. 3 हजार वर्षे जुन्या ममीच्या मदतीने वैज्ञानिकांनी या रहस्यांची उकल केली आहे. कशाप्रकारे या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणाच्या बाहेर करत त्यांचा बळी दिला जात होता हे वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. 3 हजार वर्षे जुन्या मगरीच्या ममीने प्राचीन इजिप्तमध्ये मगरीच्या पंथांशी निगडित मिथकांची अनेक योग्य उत्तरेही समोर आणली आहेत. यामुळे प्राचीन धार्मिक ग्रंथांच्या रहस्यांची उकल करण्यासही मदत झाली आहे.
मँचेस्टर विद्यापीठाचे पुरातत्वतज्ञ आणि इजिप्तचे वैज्ञानिक लिडिजा मॅकनाइट यांच्याकडून या संशोधनात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. प्राचीन इजिप्तमध्ये मगरींना सोबेक देवतेचा अवतार म्हणुन पुजले जात होते. या मगरी नील नदीत राहत होत्या. इजिप्तमध्ये अनेक ममीकृत मगरी मिळाल्या असून यातील काही 19.7 फूटापर्यंत लांबीच्या आहेत. या मगरींवरुन पूजा देखील करण्यात येत होती असे संकेत मिळाले आहेत. कधी मगरींना बळी देऊन ममीच्या स्वरुपात संरक्षित केले जात होते. मॅकनाइट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनुसार प्राचीन इजिप्तच्या लोकांनी स्वत:च्या धार्मिक विधींसाठी विशाल आकाराच्या मगरी कशा प्राप्त केल्या याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही.
मेडिनेट मॅडीच्या पुरातत्व स्थळावर एक जुनी हॅचरी (मासेमारीचे जहाज) मिळाल्यावर मगरींना पाळल्यावर मग त्यांचा बळी दिला जात असावा असा अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. परंतु या मगरी पूर्णपणे विकसित झाल्यावर त्यांना कशाप्रकारे ठेवण्यात आले असावे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनांचा शोध घेण्यासाठी बर्मिंघम संग्रहालय आणि आर्ट गॅलरीतील एका 7.2 फूट लांब ममीकृत मगरीला स्कॅन करण्यात आले. यादरम्यान वैज्ञानिकांना प्राण्याच्या आतड्याच्या आत एक कांस्य हुक आढळून आला जो, त्याच्या ममीकरणासाठी वापरण्यात आला होता असे मानले जात आहे. मगरीला प्राचीन इजिप्तच्या सोबेक देवतेला अर्पण करण्यासाठी पकडण्यात आले होते असेही पुरावे मिळाले आहेत.