महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्राण्यांचा बळी देणे कायद्याने गुन्हा

11:28 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांची पत्रकार परिषदेत माहिती 

Advertisement

बेळगाव : कोणत्याही देवदेवतांच्या नावाने प्राण्यांचा बळी देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या वडगावच्या मंगाई यात्रेमध्ये प्राण्यांचे बळी देऊ नयेत. वडगावच्या नागरिकांनी आणि मंगाई देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी भक्तिभावाने, उत्साहाने यात्रा करावी, परंतु, पशुबळी देऊ नयेत. मंगाईदेवी ही सर्वांचेच कल्याण करणारी आहे. उचगावच्या ग्रामस्थांनी मळेकरणी देवीसमोर पशुबळी देण्याची प्रथा स्वेच्छेने बंद केली. त्याचा आदर्श मंगाई देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी अपेक्षा विश्व प्राणी कल्याण मंडळ व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली. बुधवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मळेकरणी देवीच्या नावाने होणारी पशुबळी प्रथा स्वेच्छेने बंद केल्याबद्दल उचगाववासीयांचे अभिनंदन केले. सतत पंधरा वर्षे लढा देऊन आपण कोकटनूर येथील बिष्टादेवी यात्रेमध्ये होणारी पशुबळी प्रथा बंद केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींनी उचगावचा आदर्श घेऊन कोणत्याही देवस्थानांमध्ये किंवा अन्य धार्मिक स्थळांमध्ये पशुबळी दिले जाणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. ग्राम पंचायतींनी आपल्या कामाच्या कार्यप्रणालीमध्ये (अजेंडा) पशुबळी प्रथा रद्द हा मुद्दा ठेवावा, असे त्यांनी नमूद केले.

Advertisement

कायद्याचे उल्लंघन करू नये

मंगाई देवी यात्रेमध्ये धार्मिक कार्य जरूर व्हावे, मात्र उच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घेऊन तसेच प्राणीबळी निर्बंध कायदा लक्षात घेऊन देवीच्या नावाने कोणताही रक्तपात करू नये. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे समुपदेशन करावे. यात्रेच्या जागी मोठा बंदोबस्त ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करून कायद्याचे उल्लंघन त्यांनासुद्धा करता येणार नाही, असे स्पष्ट केले. कोणी आपल्या घरी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. घरी मांसाहार खाण्यास आपला विरोध नाही. परंतु, देवदेवतांच्या नावाने प्राण्यांचे बळी मात्र देऊ नयेत. उच्च न्यायालयाने यासंदर्भात कायदा केला असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते, याकडे स्वामींनी लक्ष वेधले.

क्रांतिकारी निर्णय

उचगाव ग्रा. पं. व ग्रामस्थांच्या पुढाकाराने मळेकरणी देवीसमोर पशुबळी देण्याची प्रथा बंद केली, हा मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. या निर्णयाला जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. याबद्दल विश्वकल्याण प्राणीदया मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी तसेच ग्रामस्थांच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार केला. आता हा निर्णय कायमस्वरुपी व्हावा व पुन्हा कोणताही पशु बळी जाऊ नये, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी व तसा आदेश काढावा, अशा आशयाचे निवेदन दयानंद स्वामी यांनी दिले. याप्रसंगी उचगाव ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य शशिकांत जाधव, एल. डी. चौगुले, अमरीन बंकापूर, बंटी पावशे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article