चीनमधील पवित्र पर्वत
कमळाच्या फुलाचा आकार तयार करतात 5 शिखरं
चीनचा हुआ पर्वत अत्यंत अद्भूत आहे, याला हुआशान या नावाने देखील ओळखले जाते. हे चीनच्या पवित्र पर्वतांपैकी एक आहे. माउंट हुआमध्ये प्रत्यक्षात 5 वेगवेगळी शिखरं असून यापैकी प्रत्येक शिखरावर एक मंदिर असल्याने याचे धार्मिक अत्यंत अधिक आहे. याची 5 शिखरं कमळाच्या फुलाची आकृती तयार करतात. या पर्वताची चढाई करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. आता या पर्वताशी निगडित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
चीनच्या 5 पवित्र पर्वतांपैकी एक माउंट हुआवरील अरुंद पायवाटांवर साहसी लोकच दीर्घ पायी प्रवास करू शकतात. या वाटेला ‘प्लँक रोड इन द स्काय’ या नावाने देखील ओळखले जाते. पर्वतावर तयार करण्यात आलेल्या लाकडी पायऱ्यांच्या मदतीने चढत असतात. याच्या खाली असलेली दरी पाहून घामच फुटू लागतो. याचमुळे माउंट हुआशानचा प्लँक वॉक रोड जगातील सर्वात धोकादायक हायकिंग रोड असे म्हटले जाते.
माउंट हुआच्या चहुबाजूला अत्यंत अद्भुत नैसर्गिक दृश्य दिसून येते. आकाशाला स्पर्श करणारी पर्वताची शिखरं तेथील दृश्याला अत्यंत मनमोहक करून टाकतात. माउंट हुआ पर्वत शीआनपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर शानक्सी प्रांतात आहे. हा पर्वत किन पर्वतरांगेचा हिस्सा असून जवळपास 2154 मीटर इतका उंच आहे. प्लँक रोड समवेत शिखरांवर स्वत:च्या उभ्या चढाईसाठी तो ओळखला जातो. शिखरांवर मंदिर असल्याने माउंट हुआ अनेक वर्षांपासून तीर्थस्थळ राहिले आहे.