For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सचिन, संजीतचा विजयी धडाका

06:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
सचिन  संजीतचा विजयी धडाका
Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था /बँकॉक

जागतिक बॉक्सिंग पात्रता फेरीत भारताच्या सचिन सिवाच (57 किलो) आणि संजीत कुमार (92 किलो) यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवला आणि पुढील फेरीत स्थान निश्चित केले. पॅरिस ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी सचिनला आणखी दोन सामने जिंकावे लागतील कारण त्याच्या 57 किलो वजनी गटातील केवळ तीन बॉक्सर्सना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळणार आहे. याशिवाय, संजीतला राऊंड ऑफ 64 मध्ये बाय मिळाला होता आणि आता त्यालाही आणखी दोन बॉक्सर्सना पराभूत करावे लागेल. गुरुवारी सकाळच्या सत्रात सचिन सिवाचने दुसऱ्या फेरीत तुर्कीच्या ऑलिम्पियन बटुहान सिफ्टसीवर 5-0 असा धडाकेबाज विजय मिळवून भारताला शानदार सुरुवात करुन दिली. यानंतर संजीतने व्हेनेझुएलाच्या लुईस सांचेझचे आव्हान 32 च्या फेरीत समान फरकाने मोडून काढले. दोघांनही शानदार खेळाचे प्रदर्शन करताना प्रतिस्पर्धी बॉक्सरला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. दरम्यान, अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या पॅरिस ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी सचिन सिवाच व संजीत यांना आपआपल्या गटात आणखी दोन विजय मिळवणे आवश्यक आहे. भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघलचा 51 किलो गटात सामना मेक्सिकोच्या रुईजविरुद्ध होणार आहे. पहिल्या फेरीत त्याला बाय मिळाला होता. याशिवाय, महिलांच्या 57 किलो गटात जास्मीनची लढत अझरबैजानच्या हमजायेवाविरुद्ध होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.