For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे इंग्लंडचे आव्हान शाबूत``

06:12 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे इंग्लंडचे आव्हान शाबूत
Soccer Football - Euro 2024 - Round of 16 - England v Slovakia - Arena AufSchalke, Gelsenkirchen, Germany - June 30, 2024 England's Jude Bellingham scores their first goal REUTERS/Kai Pfaffenbach
Advertisement

वृत्तसंस्था/ गेल्सेनकिर्चेन (जर्मनी)

Advertisement

इंग्लंडने युरो, 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेला असला, तरी त्यापूर्वी स्पर्धेबाहेर पडता पडता ते वाचले. ज्युड बेलिंगहॅमने इंग्लंडचे आव्हान शाबूत ठेवण्यासाठी काही तरी खास तयार करण्याची गरज होती आणि त्याने ते करूनही दाखविले. त्यावेळी पराभूत होऊन युरोपियन चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या धक्क्याची नोंद करण्यापासून इंग्लंड काही सेकंद दूर होता आणि उपउपांत्यपूर्व फेरीतील या सामन्यात स्लोव्हाकियाने त्यांना 1-0 ने पिछाडीवर टाकले होते.

पण ‘स्टॉपेज टाइम’च्या सहापैकी पाचव्या मिनिटाला बेलिंगहॅमच्या नेत्रदीपक ओव्हरहेड किकने सामना जादा वेळेत नेला आणि त्यानंतर हॅरी केनने 2-1 असा विजय मिळवून देऊन इंग्लंडच्या 1966 नंतर पहिली मोठी स्पर्धा जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. ‘मला वाटते की, आम्ही युरोपियन चॅम्पियनशिपमधून बाहेर पडण्यास 30 किंवा 20 सेकंद बाकी होते. आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतील हा सर्वांत महत्त्वाचा क्षण होता हे नाकारता येणार नाही’, असे बेलिंगहॅम नंतर म्हणाला.

Advertisement

शनिवारी 21 वर्षांच्या झालेल्या बेलिंगहॅमने नुकतेच रिअल माद्रिदसाठी चॅम्पियन्स लीग आणि स्पॅनिश विजेतेपद जिंकण्यात योगदान देऊन पदार्पणाचा एक जबरदस्त हंगाम पूर्ण केला आहे. इतक्या लहान वयात तो युरो, 2024 मधील इंग्लंडच्या सर्वांत महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक बनला आहे आणि स्लोव्हाकियाविरुद्ध जेव्हा सर्व आशा संपल्या आहेत वाटत होते तेव्हाच तो मदतीला धावून आला. स्पर्धेच्या विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या आणि मागील युरोमध्ये उपविजेत्या ठरलेल्या इंग्लंडवर इव्हान श्रान्झने 25 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे स्लोव्हाकियासमोर 1-0 ने पिछाडीवर पडण्याची पाळी आली.

सामना संपत आलेला असताना काइल वॉकरने उजवीकडून चेंडू फेकला असता मार्क गुएहीने तो फ्लिक करण्यासाठी उडी मारली. त्यावेळी बेलिंगहॅम बॉक्समध्ये होता आणि मिळालेल्या चेंडूवर अचूक ओव्हरहेड किक मारत त्याने चेंडू जाळ्यातील तळाच्या कोपऱ्यात पाठवला. त्यानंतर केनने देशासाठी विक्रमी 65 वा गोल करून इंग्लंडचा विजय निश्च़ित केला. ड्युसेलडॉर्फ येथे शनिवारी इंग्लंडचा सामना उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडशी होईल.````````````````

Advertisement
Tags :

.