For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जय श्रीरामचा नारा न दिल्यानं मुंबईत एकास मारहाण ; सचिन खरातांकडून तात्काळ कारवाईची मागणी

01:47 PM Sep 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
जय श्रीरामचा नारा न दिल्यानं मुंबईत एकास मारहाण   सचिन खरातांकडून तात्काळ कारवाईची मागणी

Sachin Kharat : जय श्रीरामचा नारा न दिल्यानं एका दलित तरूणाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. 25 सप्टेंबर रोजी रात्री मुंबईत ही घटना घडलीय.रिपाइंयचे (खरात गट)अध्यक्ष सचिन खरात यांनी याबाबत निषेध नोंदवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खरात यांनी  केली आहे. याबाबत सचिन खरात यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

Advertisement

काय म्हटलयं व्हिडिओत
मुंबईतील कांदवली येथील गोकुळ नगर येथील दलित तरूणाला जय श्री रामची घोषणा देण्यास भाग पाडले. तसेच त्याला बेदम मारहाण करण्यात आली. महाराष्ट्र हे राज्य फुले, शाहू, आंबेडरक या विचाराचे आहे. मात्र तरीही दलित तरूणाला जय श्री राम बोलण्यास भाग पाडून त्याला बेदाम मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय आहे. ज्या समाजकंटांनी हे कृत्य केले आहे. त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट आणि युएपीए कायद्या अंतर्गत  गुन्हा नोंद करून त्य़ांना अटक करावी अशी मागणी रिपाइंय खरात गटाने केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.