साबालेन्का, स्वायटेक, बोर्जेस, पॉल तिसऱ्या फेरीत
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : होल्गर रुनेचीही आगेकूच, कास्पर रुड, राडुकानू, सित्सिपस यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/पॅरिस
दोन वेळ प्रेंच ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या कास्पर रुडला डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला प्रेंच ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. शेवटच्या 14 पैकी 13 गेम्स त्याने या सामन्यात गमविले. नुनो बोर्जेसने त्याला हरवून तिसरी फेरी गाठली. एरिना साबालेन्का, इगा स्वायटेक, होल्गर रुने, टॉमी पॉल यांनीही तिसरी फेरी गाठली तर एम्मा राडुकानू, डोना व्हेकिच, स्टेफानोस सित्सिपस यांचे आव्हान संपुष्टात आले.
6-3 असा विजय मिळविला तर 12 व्या मानांकित अमेरिकेच्या टॉमी पॉलने दोन सेटची पिछाडी भरून काढत मार्टन फुक्सोविक्सवर विजय मिळविला. तिसरी फेरी गाठणाऱ्या अन्य खेळाडूंत 25 वा मानांकित अॅलेक्सी पॉपीरिनचा समावेश आहे. मात्र 20 व्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसचे आव्हान बिगरमानांकित मॅटेव गिगान्टेने संपुष्टात आणले. महिला एकेरीत पोलंडच्या इगा स्वायटेकने 2021 ची यूएस चॅम्पियन एम्मा राडुकानूचे आव्हान 6-1, 6-2 असे झटपट संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली.
बोपण्णा, बालाजी, युकी भांब्री जोडीदारांसह दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत
भारताचा रोहन बोपण्णा व एन.श्रीराम बालाजी यांनी आपापल्या जोडीदारांसमवेत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. दुसरी फेरी गाठणाऱ्यांत भारताचे एकूण तीन खेळाडू आहेत. बोपण्णा व त्याचा झेकचा साथीदार अॅडम पावलासेक यांनी अमेरिकेच्या रॉबर्ट कॅश व जेजे टॅसी यांच्यावर 7-6 (10-8), 5-7, 6-1 अशी संघर्षपूर्ण लढतीत मात केली. दोन तास 11 मिनिटे रंगलेल्या या झुंजीत विजयी जोडीने 4 ब्रेक पॉईंट्सचा लाभ उठविला आणि पहिल्या सर्व्हवर त्यांनी 68 टक्के गुण मिळविले. नंतर बालाजी व त्याचा मेक्सिकोचा जोडीदार मिग्वेल रेएस व्हॅरेला यांनी चीनचा युनचाओकेटे बु व अर्जेन्टिनाचा कॅमिलो युगो काराबेली यांचा 51 मिनिटांत 6-2, 6-1 असा धुव्वा उडविला. प्रारंभापासून वर्चस्व राखत विजयी जोडीने चार बिनतोड सर्व्हिस केल्या. याशिवाय युकी भांब्रीने अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवेसमवेत दुसरी फेरी गाठताना रॉबिन हास व हेन्ड्रीक जेबेन्स यांचा 6-3, 6-7 (8-10), 6-3 असा पराभव केला.