महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साबालेन्का, गॉफ, सीगमंड, ओसाका तिसऱ्या फेरीत

06:55 AM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हेरेव्ह, अल्कारेझ, जोकोविच, पेगुला, अँड्रीव्हा यांचीही आगेकूच, किनवेनचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

जागतिक द्वितीय मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने ऑस्ट्रेलियन ओपन मोहिमेची विजयाने सुरुवात करीत तिसरी फेरी गाठली तर स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, मॅकहेक यांनी तसेच महिलांमध्ये कोको गॉफ, एरिना साबालेन्का, नाओमी ओसाका, लॉरा सीगमंड, लैला फर्नांडेझ, जेसिका पेगुला, मायरा अँड्रीव्हा यांनी तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ऑलिम्पिक सुवर्णविजेती झेंग किनवेनचे आव्हान मात्र दुसऱ्याच फेरीत समाप्त झाले,

पुरुष एकेरीच्या जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझचा 6-1, 6-4, 6-1 असा सहज पराभव करून तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. गेल्या वर्षी त्याने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याला आजवर एकदाही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्याची लढत ब्रिटनच्या जेकब फियर्नलीशी होणार आहे. स्पेनच्या अल्कारेझने तिसरी फेरी गाठताना जपानच्या योशिहितो निशिओकाचा 6-0, 6-1, 6-4 असा धुव्वा उडविताना 14 बिनतोड सर्व्हिस नोंदवल्या. जोकोविचला सलग दुसऱ्या सामन्यात पदार्पणवीरावर विजय मिळविण्यासाठी चार सेट्स झुंजावे लागले. त्याने 19 वर्षीय अमेरिकेच्या निशेष बवसवरे•ाrवर पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर 21 वर्षीय जेमी फारियावर 6-1, 6-7 (4-7), 6-3, 6-2 अशी मात केली. त्याची पुढील लढत टॉमस मॅकहॅकशी होईल. मॅकहॅकने रीली ओपल्काला 3-6, 7-6 (7-1), 6-7 (5-7), 7-6 (7-4), 6-4 असे संघर्षानंतर हरवित आगेकूच केली.

गॉफ, लैला विजयी

महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने या मोसमातील विजयी घोडदौड कायम राखताना ब्रिटनच्या जोडी बरेजवर 6-3, 7-5 अशी मात केली. ही लढत दीड तास रंगली होती आणि तिचा हा या मोसमातील 11 वा विजय होता. डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद मिळविताना सलग चार विजय मिळविले होते, त्याचाही या समावेश आहे. तिची पुढील लढत लैला फर्नांडेझशी होईल. लैलाने तिसरी फेरी गाठताना क्रिस्टिना बुक्साचा 3-6, 6-4, 6-4 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 97 व्या स्थानावर असणाऱ्या लॉरा सीगमंडने चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या झेंग किनवेनला 7-6 (7-3), 6-3 असा पराभवाचा धक्का दिला.

साबालेन्काचा सलग 16 वा विजय

मेलबर्न पार्कवरील विजयी मालिका 16 सामन्यावर नेताना साबालेन्काने 54 व्या मानांकित जेसिका बुझास मॅनेरोवर 6-3, 7-5 अशी मात केली. 2014 मध्ये क्हिक्टोरिया अझारेन्काने या स्पर्धेत सलग 16 सामने जिंकले होते. तिच्या विक्रमाशी साबालेन्काने येथे बरोबरी केली. ती सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून मार्टिना हिंगीसच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंगीसने 1997 ते 99 अशी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने 2022 नंतर प्रथमच या स्पर्धेची तिसरी फेरी गाठताना कॅरोलिना मुचोव्हाचा 1-6, 6-1, 6-3 असा धुव्वा उडविला. ओसाका मागील वर्षी पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. ओसाकाची पुढील लढत बेलिंडा बेन्सिकशी होईल. बेलिंडाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते. अन्य सामन्या सातव्या मानांकित जेसिका पेगुलाने एलिस मर्टेन्सवर 6-4, 6-2, 17 वर्षीय अँड्रीव्हाने मोयुका उचिजिमावर 6-4, 3-6, 7-6 (10-8) अशी मात करून तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :
#sports#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article