एस 25 ची आवृत्ती आता एआय फिचर्ससह
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड लाँच इव्हेंट 22 जानेवारी रोजी : बुकिंग सुरु
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक कंपनी सॅमसंगने त्यांच्या वार्षिक लाँचिंग इव्हेंट ‘गॅलेक्सी अनपॅक्ड 2025‘ ची तारीख जाहीर केली आहे. हा इव्हेंट 22 जानेवारी रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता कार्यक्रम लाईव्ह होईल. कंपनी या इव्हेंटमध्ये त्यांचा फ्लॅगशिप एस सिरीज स्मार्टफोन्स लाँच करेल.
त्यामध्ये गॅलेक्सी एस25, गॅलेक्सी एस25 प्लस आणि गॅलेक्सी एस 25 अल्ट्राचा समावेश आहे. याशिवाय, कोरियन कंपनी गॅलेक्सी ट्राय-फोल्ड फोन आणि गॅलेक्सी एस 25 स्लिम फोन देखील सादर करू शकते. ब्रँडने स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग सुरू केले आहे.
तुम्ही गॅलेक्सी एस सिरीजचा फ्लॅगशिप फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, देशभरातील ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये 2000 रुपये टोकन मनी देऊन प्री-बुकिंग करू शकता. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना नवीन गॅलेक्सी एस सिरीज डिव्हाइस खरेदीवर 5000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे.
सर्व फोन प्रगत एआयने सुसज्ज
कंपनीचे म्हणणे आहे की नवीन सॅमसंग गॅलेक्सी एस25 सिरीजचे सर्व मॉडेल प्रगत आणि पुढील पिढीतील आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये जेमिनी नॅनो व्ही2 एआय तंत्रज्ञान पाहता येते.
किती असणार किंमत
सॅमसंग गॅलेक्सी 25 सिरीज: अपेक्षित किंमत मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग एस25 79,999 च्या सुरुवातीच्या किमतीत, एस25 प्लस 99,999 मध्ये आणि एस25 अल्ट्रा 1,29,999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करू शकते.