महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विंडीजकडून द. आफ्रिकेचा मालिकेत व्हाईटवॉश

06:22 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ किंग्जस्टन

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान विंडीजने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विंडीजने दक्षिण आफ्रिकेचा 37 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. विंडीजच्या जॉन्सन चार्लसला सामनावीर तर गुडाकेश मोतीला (8 बळी) मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 7 बाद 163 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 13.5 षटकात 2 बाद 165 धावा जमवित विजय नोंदविला.

दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार व्हॅनडेर ड्युसेनने 31 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह 51, मुल्डेरने 28 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 36, डिकॉकने 18 चेंडूत 3 चौकारांसह 19, रिक्लेटोनने 14 चेंडूत 3 चौकारांसह 18, व्रुगेरने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 10 अवांतर धावा मिळाल्या. विंडीजतर्फे मॅकॉयने 39 धावांत 3 तर जोसेफने 26 धावांत 2 आणि मोतीने 21 धावांत 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 7 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकात 45 धावा जमविताना 2 गडी गमाविले. दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक 46 चेंडूत, शतक 87 चेंडूत तर दीडशतक 113 चेंडूत फलकावर लागले. कर्णधार ड्युसेनने 30 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह अर्धशतक झळकाविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार किंग आणि चार्लस यांनी विंडीजच्या डावाला दमदार सुरुवात करुन देताना 40 चेंडूत 92 धावांची भागिदारी केली. किंगने 28 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 44 तर चार्लसने 26 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह 69 धावा झोडपल्या. मेयर्सने 23 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 36 तसेच अॅथांजेने नाबाद 6 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. विंडीजच्या डावात 13 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजला 10 अवांतर धावा मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे कोएत्झी आणि पिटर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकात एकही गडी न गमाविता 83 धावा झोडपल्या. चार्लसने 4 षटकार आणि 7 चौकारांसह 20 चेंडूत अर्धशतक नोंदविले. विंडीजचे अर्धशतक 19 चेंडूत तर शतक 46 चेंडूत व दीडशतक 79 चेंडूत फलकावर लागले.

संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका 20 षटकात 7 बाद 163 (व्हॅन डेर ड्युसेन 51, मुल्डेर 36, डिकॉक 19, रिक्लेटोन 18, व्रुगेर नाबाद 16, अवांतर 10, मॅकॉय 3-39, जोसेफ 2-26, मोती 2-21), विंडीज 13.5 षटकात 2 बाद 165 (किंग 44, चार्लस 69, मेयर्स नाबाद 36, अथांजे नाबाद 6, अवांतर 10, पिटर 1-27, कोएत्झी 1-37).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article