रशियाचा ‘डेड हँड’ इशारा, अमेरिकेकडून पाणबुड्या तैनात
दोन सैन्य महासत्तांदरम्यान आण्विक तणाव : जागतिक स्थिरतेला पोहोचणार हानी
वृत्तसंस्था/ मॉस्को, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी रशिया आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘डेड इकोनॉमी’ असे संबोधिले होते. ट्रम्प यांच्या या टिप्पणीवरील वाद आता वाढला असून अमेरिका आणि रशियादरम्यान आण्विक तणावात तो रुपांतरित होत असल्याचे दिसून येत आहे. रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांनी दोन अमेरिकन आण्विक पाणबुड्यांना रणनीतिक स्थानांवर तैनात करण्याचा आदेश दिला आहे. रशियाकडून ‘डेड हँड’सारख्या धोकादायक रणनीतिचा उल्लेख करण्यात आल्यावर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे.
डेड हँड एक शीतयुद्ध काळातील आण्विक यंत्रणा असून ती रशियाचे पूर्ण नेतृत्व समाप्त झाल्यावरही स्वत: आण्विक हल्ला घडवून आणू शकते. मेदवेदेव यांनी या रणनीतिचा उल्लेख करत अमेरिकेला इशारा दिला होता, ज्यानंतर ट्रम्प यांनी पाणबुड्यांना रशियानजीक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेचे आण्विक पाणबुडी सामर्थ्य
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (ओहायो क्लास)
अमेरिकेकडे 14 ओहायो-क्लास एसएसबीएन असून त्या दीर्घकाळापर्यंत पृष्ठभागावर न येता संचालन करू शकतात. या पाणबुड्या 20 ट्रायडेंट 2 डी5 क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.
फास्ट अटॅक पाणबुडी (वर्जीनिया, सीवोल्फ, लॉस एंजिलिस)
अमेरिकेकडे 24 वर्जीनिया-क्लास एसएसन असून यात आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी खास चेंबर आहे. अमेरिकेडे 3 सीवोल्फ-क्लास पाणबुडया असून यात अधिक शस्त्रास्त्रs वाहून नेण्याची क्षमता आहे. अमेरिकेकडे 24 लॉस एंजिलिस-क्लास पाणबुड्या अद्याप सेवेत आहेत, ज्या 1976 पासून सोव्हियत महासंघाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी कार्यरत आहेत.
रशियाचे आण्विक पाणबुडी सामर्थ्य
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (बोरेई, डेल्टा 4)
रशियाकडे 8 बोरेई-क्लास एसएसबीएन असून त्या 16 बुलावा क्षेपणास्त्रs आणि 6 टॉरपीडो लाँचर वाहून नेऊ शकतात. या पाणबुड्या डेल्टा-4 क्लासची जागा घेत असून यातील अद्याप 6 सक्रीय आहेत. डेल्टा-4 मध्ये 16 सिनेवा एसएलबीएम्स तैनात असतात.
फास्ट अटॅक पाणबुडी (यासेन, अकुला)
रशियाकडे 4 यासेन-क्लास फास्ट अटॅक पाणबुडया असून यात कॅलिबर आणि ओनिक्स क्षेपणास्त्रs जोडली जातात. 5 अकुला-क्लास (शार्क) अत्यंत घातक असून त्या कॅलिबर, ओनिक्स आणि ग्रॅनिट क्षेपणास्त्रs डागण्यास सक्षम आहेत.