महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरुच

06:01 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / कीव्ह 

Advertisement

युक्रेनवर रशियाने मोठा हल्ला केला आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या साहाय्याने केलेल्या या हल्ल्यात युक्रेनची मोठी हानी झाल्याची माहिती देण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हल्ल्याला प्रारंभ करण्यात आला होता. रशियाने युक्रेनमधील वीजनिर्मिती केंद्रांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये वीजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. युक्रेनेग्रो या वीजनिर्मिती कंपनीच्या दोन केंद्रांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

युक्रेनच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेनेही रशियाची 16 पैकी 12 क्षेपणास्त्रे नष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच रशियाने सोडलेल्या 13 ड्रोन्सपैकी एकही ड्रोन रशियाला परत जाऊ शकलेले नाही. त्यामुळे रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची हानी झाली असली तरी रशियालाही मोठा फटका बसला आहे, अशी माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांनी या हल्ल्यासंदर्भात परस्पविरोधी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे गोंधळात भर पडली आहे.

फारशी प्रगती नाही

रशियाने युक्रेनसमवेतच्या 1,000 किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवर गेल्या आठ दिवसांपासून मोठे हल्ले चढविलेले आहेत. तथापि, सीमारेषेच्या आत घुसण्यात रशियाच्या सैन्याला फारसे यश आलेले नाही. युव्रेनची वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्या देशाने फारशी भूमी गमावलेली नाही. आत घुसण्याचे रशियाचे प्रयत्न युक्रेनचे सैनिक असफल ठरवित आहेत, असेही काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र, रशियाने मोठे यश मिळविल्याचा दावा शनिवारी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article