For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकर्णमध्ये रशियन महिलेचे मुलांसह जंगलात वास्तव्य

06:14 AM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोकर्णमध्ये रशियन महिलेचे मुलांसह जंगलात वास्तव्य
Advertisement

गस्तीवरील पोलिसांकडून रक्षण : मायदेशी परत पाठविण्याच्या हालचाली

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कारवार जिल्ह्यातील गोकर्णमधील जंगलात दोन लहान मुलांसह वास्तव्य करणाऱ्या 40 वर्षीय रशियन महिलेचे रक्षण करण्यात आले आहे. अध्यात्मामध्ये गुंतलेली ही महिला जंगलातील गुहेत वास्तव्यास होती. पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असतानाच गस्तीवरील पोलिसांनी 9 जुलै रोजी तिला सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Advertisement

मोही (वय 40), प्रेया (वय 6) आणि अमा (वय 4) अशी त्यांची नावे आहेत. रशियाहून गोव्यात आणि तेथून गोकर्णमध्ये आलेल्या मोहीला अध्यात्माची ओढ निर्माण झाल्यामुळे गोकर्णमधील वनभागात वास्तव्यास होती. तिने बांधलेल्या खोपट्यात रुद्र देवाची लहान मूर्ती आढळली आहे. भूस्खलनाच्या घटनांमुळे रामतीर्थ वनभागात सीपीआय श्रीधर यांच्या नेतृत्त्वातील पोलिसांचे एक पथक या भागात गस्त घालत होते. यावेळी रशियन महिला जंगलात वास्तव्यास असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

भूस्खलनाची शक्यता, वन्य प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने ती जागा सुरक्षित नसल्याने पोलिसांनी तिला आणि तिच्या मुलांना कुमठा येथील आश्रमात नेण्यात आले. पोलिसांनी मोहीला पासपोर्टविषयी विचारणा केली. मात्र, तिने अनेक कारणे सांगितली. पासपोर्ट गहाळ झाल्याचे सांगितले. संशय आल्याने पोलिसांनी ती वास्तव्यास असलेल्या गुहेची झडती घेतली असता तिचा पासपोर्ट आढळला. तिच्या व्हिसाची मुदत 17 एप्रिल 2017 मध्येच संपल्याचे आढळले. तिच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी महिला-बालकल्याण खात्याच्या महिला सांत्वन केंद्रात दाखल केले.

पोलिसांनी ही बाब बेंगळूरमधील एफआरआरओच्या निदर्शनास आणून दिली आहे. तिला रशियाला परत पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.