कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अण्वस्त्राशी निगडित रशियन उपग्रह नियंत्रणाबाहेर

06:15 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अंतराळात एक रशियन उपग्रह अनियंत्रित स्वरुपात फिरताना दिसून येत आहे, यामुळे हा  उपग्रह आता काम करत नसल्याचे संकेत मिळतात. मॉस्कोच्या अंतराळ अस्त्र कार्यक्रमासाठी हा एक झ्टका असू शकतो असे अमेरिकेच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. हा उपग्रह आण्विक उपग्रह-विरोधी अस्त्र कार्यक्रमाशी संबंधित असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मानणे आहे. अंतराळ-ट्रॅकिंग फर्म लियोलॅब्सच्या डापलर रडार डाटा आणि स्लिंगशॉट एअरोस्पेसच्या ऑप्टिकल डाटानुसार 2022 मध्ये युक्रनवर आक्रमण करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी रशियाकडून प्रक्षेपित कॉस्मोस 2553 उपग्रहामध्ये मागील वर्षभरापासून बिघाड झाल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

रशिया अनेक वर्षांपासून एक अण्वस्त्र विकसित करत आहे, जो पूर्ण उपग्रह नेटवर्कला नष्ट करण्यास सक्षम असल्याचा आरोप अमेरिकेने मागील वर्षी केला होता. स्पेसएक्सच्या विशाल स्टारलिंक इंटरनेट प्रणालीचा वापर सध्या युक्रेनियन सैनिक करत आहेत. ही प्रणाली नष्ट करण्याचा रशियाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article