रशिया आण्विक युद्धासाठी तयार : पुतीन
अमेरिकेने युक्रेनमध्ये सैनिक वाढल्यास युद्ध चिघळणार
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी अमेरिकेला आण्विक हल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने युक्रेनमध्ये स्वत:चे सैनिक पाठविले तर युद्धाची व्याप्ती वाढू शकते असे पुतीन यांनी म्हटले आहे. आम्ही सध्या आण्विक युद्धाच्या दिशेने पावले टाकणार नाही, आम्हाला अद्याप याची आवश्यकता भासलेली नी. परंतु सैन्य किंवा तंत्रज्ञानाच्या आधारावर आम्ही आण्विक युद्धासाठी तयार आहोत. रशिया किंवा युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सैनिकांना पाठविण्यात आल्यास आम्ही याला हस्तक्षेप मानू असे पुतीन यांनी सांगितले आहे.
आमच्याकडे वापर करण्यासाठी अण्वस्त्रs आहेत. परंतु अण्वस्त्रांच्या वापरावरून रशियाची स्वत:ची तत्वे आहेत. रशियावर अण्वस्त्र किंवा अन्य अशाचप्रकारच्या अस्त्रांच वापर करण्यात आला तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो असा दावा पुतीन यांनी केला आहे.
रशियाचे अस्तित्व धोक्यात आल्यास आम्ही आमचे रक्षण अवश्य करू. आम्ही युक्रेनसेबत पूर्ण गांभीर्याने चर्चा करण्यास तयार आहोत. परंतु ही चर्चा सद्यकाळातील वस्तुस्थितीवर आधारित असायला हवी. अमेरिकेने जर आण्विक परीक्षण केले तर आम्ही देखील अशाचप्रकारचे पाऊल उचलू शकतो. परंतु अमेरिकेत रशिया-अमेरिका संबंधांपासून सामरिक संयमाच्या क्षेत्राशी निगडित अनेक तज्ञ आहेत. याचमुळे गोष्ट आण्विक युद्धापर्यंत पोहोचेल असे मला वाटत नाही असे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत. रशिया आणि अमेरिका हे 2 सर्वात शक्तिशाली अण्वस्त्रसज्ज देश आहेत. जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी 90 टक्के अण्वस्त्रs याच दोन्ही देशांकडे आहेत.