महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिनोळी बुद्रुक महालक्ष्मी यात्रेला भाविकांची अलोट गर्दी

10:51 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल 28 वर्षांनंतर भरली यात्रा : चंदगड-बेळगाव तालुक्यातील भक्तांची गर्दी : पावसातही देवीच्या दर्शनासाठी भक्तांमध्ये उत्साह

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

शिनोळी बुद्रुक गावातील महालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार दि. 14 रोजीपासून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सुरू झाली आहे. तब्बल 28 वर्षांनंतर गावात यात्रा भरविण्यात आली असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये व भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी चंदगड व बेळगाव  तालुक्यातील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. गेल्या महिन्याभरापासून यात्रा उत्सव कमिटी यात्रेच्या तयारीमध्ये मग्न होते. गावात 28 वर्षानंतर यात्रा भरवण्यात आल्यामुळे सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले आहे. शुक्रवारी पाऊस झाला तरीही भक्तांमध्ये देवीच्या दर्शनासाठी उत्साह दिसून आला. मंगळवार दि. 14 रोजी पहाटे महालक्ष्मी देवी मंदिर परिसरात देवीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विवाह सोहळा झाल्यानंतर देवी रथावर विराजमान झाली आणि त्यानंतर गावात देवीची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

पारंपरिक वाद्यांच्या व ढोल ताशाच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत महालक्ष्मी देवीचा जयघोष करीत देवीची रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तऊणाई व सर्वांमध्ये उत्साह दिसून आला. पुन्हा बुधवारी शिनोळी बुद्रुक गावात रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस मिळून सुमारे 250 भंडाऱ्याच्या पोत्यांची उधळण भाविकांनी जल्लोषात केली. बुधवार दि.15 रोजी सायंकाळी मरगाई देवी मंदिराजवळ महालक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान झाली. यात्रोत्सव कमिटीच्या वतीने भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर यात्रोत्सव कमिटी, हक्कदार व पंचकमिटीच्या वतीने ओटी भरण्यात आली. त्यानंतर गाऱ्हाणा व इतर धार्मिक विधी करण्यात आली. यात्रेसाठी अगसगे येथील रथ शिनोळी बुद्रुक ग्रामस्थांनी आणला आहे. हा रथ नुकत्याच झालेल्या बीजगर्णी-कावळेवाडी येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेतही होता. बिजगर्णी गावातील यात्रा झाल्यानंतर वाजतगाजत या रथाचे साहित्य शिनोळी बुद्रुक गावात आणण्यात आले होते.

पंधरा दिवसांपासून रथ जोडणीचे काम

सुमारे 60 फूट उंच इतका हा रथ आहे. रथाच्या बाजूला विविध देवदेवतांचे फोटो आहेत. तर वरच्या टोकाला आकर्षक अशी मोराची मूर्ती आहे. त्यामुळे यात्रेतील रथोत्सव मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव दत्ताप्पा पाटील, उपाध्यक्ष बाबू ईश्वर पाटील, एन. डी. बोकनुरकर, परशराम पाटील, सोपान पाटील, श्रीपती गुडेकर, यशवंत डागेकर, शिवाजी मेनसे, आकाश बेळगावकर, नितीन पाटील, नामदेव राघोजी, रघुनाथ गुडेकर आदींसह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेताना दिसत आहेत. गुऊवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रंगाच्या रांगा लागल्या. शुक्रवारी दुपारपासूनच या भागात वळिवाचा पाऊस झाला. तरीही देवीच्या दर्शनाची ओढ असल्यामुळे भक्तांची गर्दी दिसून आली. सुख-समाधान आणि समृद्धी मिळावी यासाठी भक्त देवीकडे प्रार्थना करताना दिसत होते. यात्रेनिमित्त आईक्रीम, खेळणी, खाऊचे पदार्थ असे विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. याचा आनंदही बालचमू व महिला लुटतानाचे चित्र पहावयास मिळाले. मंगळवार दि. 21 रोजी सीमेवरती या यात्रेची सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article