For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी झुंबड

11:13 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
जन्म मृत्यू दाखल्यांसाठी झुंबड
Advertisement

नगरसेवक कार्यालयात; जनता रांगेत : मंगळवारी मनपा कार्यालयात उडाला गोंधळ

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत. पालकांना आपल्या मुलांचा शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जन्म दाखल्याची नितांत गरज आहे. त्यामुळे मंगळवारी जन्म दाखला मिळविण्यासाठी अक्षरश: मोठी झुंबड उडाली होती. यावेळी नगरसेवक थेट त्या विभागात ठाण मांडून होते. त्यामुळे रांगेत असलेल्या नागरिकांनी त्याविरोधात तक्रार केली. यामुळे गोंधळ उडाला. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी नेहमीच गर्दी असते. मात्र आता विशेषकरून जन्म दाखल्यासाठीच अधिक गर्दी आहे. कारण शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्म दाखला आवश्यक असल्याने पालक जन्म दाखल्यासाठी महानगरपालिकेसमोर गर्दी करत आहेत. सोमवारीही दिवसभर गर्दी होती. त्यानंतर मंगळवारी तर अधिकच गर्दी होती. मात्र यातच काही नगरसेवक थेट संबंधित विभागातच जावून ठाण मांडून होते. आपल्या परिचयातील, तसेच नातेवाईकांचे जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी नगरसेवक धडपडत होते. तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना मला तातडीने दाखला द्या, असे सांगत होते. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांनी त्याविरोधात तक्रार केली. काहीजणांना तुम्ही आत प्रवेश देता व थेट जन्म-मृत्यू दाखले देता. मग आम्ही का रांगेत उभे रहावे? असा प्रश्न उपस्थित करून त्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकारामुळे काहीकाळ गोंधळ उडाला.

कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण...

जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी नेहमीच गर्दी होत आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र काहीजण थेट कार्यालयात जावून कर्मचाऱ्यांना काम करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण पडत असल्याने मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर त्या विभागात धाव घेतली. त्यानंतर तेथील काहीजणांना बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे गोंधळ निवळला.

- डॉ. संजीव नांद्रे, आरोग्याधिकारी

Advertisement
Advertisement
Tags :

.